मधुकर गोंगले उपसंपादक (गडचिरोली)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इंदापूर:- पत्रकार दिनानिमित्त इंदापूर तालुका प्रतिनिधी गणेश धनवडे यांचा आज सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात जेष्ठ नागरिक व प्रगतशील बागायतदार भगवानराव रणसिंग यांच्या शुभहस्ते गणेश धनवडे यांचा लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालय बोराटवाडी च्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी पत्रकारितेतील त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास श्री. धनवडे बापू, श्री. राजेंद्र रणमोडे, श्री. नवनाथ कुंभार, श्री. प्रदीप रणमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार समाजाचा आरसा असून लोकशाही बळकट करण्यामध्ये पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
इंदापूर तालुक्यातील गणेश धनवडे हे आपले दुःख विसरून आपल्या तालुक्यातील नागरिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून लिखाण करत आहे. त्यामुळे अशा पत्रकाराचा सत्कार होणे हे आज गरजेच आहे जेणे करून अशा पत्रकारांना अजून लिखाण करायला जोश वाढत जाईल. आणि जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात येईल.

