मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली:-* सुरजागड येथील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या ठाकूर देवाचे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विधिवत पूजन करून दर्शन घेतले.पारंपरिक धार्मिक विधी आणि आदिवासी रितीरिवाजांनुसार हे पूजन पार पडले.या वेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पूजनाच्या वेळी स्थानिक पुजारी,आदिवासी बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ठाकूर देवाच्या चरणी नारळ, फुले अर्पण करून महाराजांनी परिसरातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी,शांती आणि विकासासाठी प्रार्थना केली.सुरजागड हा परिसर आदिवासी संस्कृती व परंपरेसाठी विशेष महत्त्वाचा असून ठाकूर देवावर येथील नागरिकांची अढळ श्रद्धा आहे.
दर्शनानंतर राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत चर्चा केली तसेच त्यांच्या परंपरा,संस्कृती जपण्याची गरज अधोरेखित केली.सुरजागड परिसरातील विकास हा पर्यावरण आणि स्थानिकांच्या हिताला पूरक असावा,असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सुरजागड ग्रामसभा इलाखा अध्यक्ष कल्पनाताई आलाम,राजू पुंगाटी,अनिल कुर्लीवार,शामराव दोरपेटी,मोहन नामेवार,मंगू दोरपेटी,रेन्द्र येमला,राजू मुडमा,प्रशांतभाऊ आत्राम,बाबला मुजुमदार,प्रसाद पुल्लूरवार,येवलं पुलके, संपत पेंडाकुलवार,अनिकेत मामीडवार, अविष्कार गड्डामवार आणि तसेच मोठया संख्येने तालुक्यातील इलाखा प्रमुख, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

