बानय्या जनगाम यांचे आ़ धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*सिरोंचा ==*
तालुक्यातील झिंगानूर परिसरातील अनेक शेतकरी अनेक वर्षापासून वनजमिनीवर अतिक्रमण करुन शेतपिकाची लागवड करीत कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत़ मात्र त्यांना शासनाद्वारे अद्यापही वनपट्टे मिळालेले नाही़ परिणामी ते शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहेत़ त्यामुळे झिंगानूपर परिसरात वनहक्क समितीमार्फत जीपीएस सर्वे करुन भूमहिन शेतक-यांना वनहक्क कायद्याने वनपट्टे देण्यात यावे, अशी मागणी *राकाँचे (अजित पवार गट) कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगम यांनी माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचेकडे निवेदनातून केली आहे़.*
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून काही शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करीत शेतपीक घेत आले आहे़ या शेतीवरच त्यांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाह चालत आला आहे़ *झिंगानूर परिसरातील झिंगानूर, मंगीगुड्डम, वडदेली, येडसीली, रमेशगूडम, किष्ठय्यपल्ली, कर्जेली, कोर्ला, कोर्ला माल व झिंगानूर* परिसरातील वनहक्कधारक व शेतक-यांच्या वनहक्क समितीअंतर्गत अतिक्रमित जमिनीचे जीपीएसद्वारे मोजणी करण्यात आली़ मात्र अद्यापही अनेक अतिक्रमित शेतक-यांची मोजणी झालेली नाही़ त्यामुळे झिंगानूर परिसरात वनहक्क समितीमार्फत् जीपीएस सर्वे करुन संबंधित भूमिहीन शेतक-यांना वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टे देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी *बानय्या जनगाम* यांनी निवेदनातून केली आहे़. यावर *आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सकारात्मक चर्चा करीत यासाठी वनविभाग तसेच जिल्हा प्रशासनाला याबाबत निर्देश देण्याचे ठोस आश्वासन दिले.*

