विश्वास वाडे, प्रतिनिधी चोपडा
चोपडा:- काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात ईडीची बेकायदेशीर चौकशी लावून मानसिक त्रास देण्याचा काम केंद्र सरकार कडून केलं जात असल्याने आज संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. चोपड्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऑड.संदीप भैया पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह आंदोलन करण्यात आले त्यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील शहराध्यक्ष के. डी. चौधरी, देवानंद शिंदे, राजेंद्र पाटील, अजबराव पाटील नंदकिशोर सांगोंरे, अनिल पाटील, गोपाळ सोनवणे, एन एस यु आयचे प्रदेश सचिव चेतन बाविस्कर, यांच्यासह चोपडा शहर व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.