संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय बौद्ध महासभा, तालुका राजुरा, शहर, ग्राम शाखा यांच्या मार्फत राजुरा येथील सम्यक बुध्द विहार सोमनाथपूर वॉर्ड राजुरा येथे दिनांक 04 जानेवारी रोज रविवारला समता सैनिक दलचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. समता सैनिक दलचे ध्वजचे ध्वजारोहण किशोर तेलतुंबडे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करून परिचय दिला समता सैनिक दलाच्या मेजर व बौध्द उपसाक व उपासिकानी ध्वजाला जय भीम म्हणून मानवंदना देण्यात आली.
सर्व प्रथम तथागत गौतम बुध्द व विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक धर्मुजी नगराळे अध्यक्ष यांनी केले. यावेळी समता सैनिक दल म्हणजे काय? १) समताजात, धर्म, लिंगभेद, न्याय, हक्क, अंधश्रद्धा, स्वातंत्र्य, बंधुत्व सर्व व्यसनापासून अलिप्त अशा लोकांच्या समूह व विषमतेला नष्ट करून समता प्राप्त करणारी टोळी यास समता असे म्हणतात.
२) सैनिक म्हणजे देशाचे, राज्याचे, जिल्ह्याचे किंवा समाजाचे सौरक्षण करणारा व स्वत: प्रशिक्षित शिस्तबध्द व लढाऊ शिक्षण घेतले असलेल्या व्यक्तीस सैनिक असे म्हणतात. ३) दल म्हणजे लढाई करणारी टोळी किंवा संघटना यास दल असे म्हणतात व या तीनही कार्यास मिळून समता सैनिक दल असे म्हणतात. या समता सैनिक दलाची स्थापना दि. २० मार्च १९२७ साली महाड या ठिकाणी झाली आणि राजुरा तालुका मध्ये आज रवीवारला सम्यक बुध्द विहार सोमनाथ पूर वॉर्ड राजुरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या “समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर” चे आयोजन करण्यात आले.
यानंतर गौतम जुलमे यांनी सावित्रीबाई फुले बद्दल थोडक्यात माहिती सांगितली प्रा.दिनेश घागरगुंडे यांनी समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा बद्दल सांगितले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण कुंभारे यांनी समता सैनिक दल शिबिरच्या जास्तीत जास्त लाभ सैनिकांनी घ्यावे असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन गुरुबालक मेश्राम, संदीप सोनोने यांनी सावधान, विश्राम, दाये – बाये मूड, कदमताल, सलामी, प्रॅक्टिकल मध्ये शिकविण्यात आले त्यानंतर पन्नास सैनिक मधून पंचेवीस सैनिकायांचे पेपर घेण्यात आले.
या कार्यक्रमात विशेष उपस्थित मध्ये प्रफुल भगत जिल्हा उपाध्यक्ष, गौतम चौरे, कृष्णदास गजभिये, पुरुषोत्तम वनकर, प्रभाकर लोखंडे, वंदना देवगडे, किरण खैरे, आम्रपाली अलोने, कमल टेकाडे, रत्नमाला मावलीकर, मेघा बोरकर, जयश्री उपरे, शारदा मोडक, देवता कोटनाके, अर्चना निमसरकर, ज्योत्स्ना वनकर, चंद्रकला ब्राह्मणे, वैजयंती वाघमारे इत्यादी उपासक व उपासिकानी समता सैनिक दल चे प्रशिक्षण मध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाचे संचालन गौतम देवगडे कोषध्यक्ष यांनी केले सामूहिक सरणत्य घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.

