नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे महिला डॉक्टर, पोलिस, वनरक्षक, प्राचार्य व जनेटरिक मेडिकल संचालिकेचा सत्कार, सावित्रीबाई फुले जयंती निमित्य केले आयोजन.
संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे “स्त्री शक्तीचा जागर, सन्मान महिलांचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनिता उगदे राजुरा तालुका महिला संघटीका नेफडो ह्या होत्या. तर सत्कारमूर्ती म्हणून प्रवीना पडोळे उपनिरीक्षक पोलिस स्टेशन राजुरा, डॉ. माया राजुनंद गायकवाड वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय राजुरा, माधुरी प्रमोद साळवे संचालिका, साळवे जेनेटरिक मेडिकल राजुरा, अंकिता बंडू नेव्हारेवनरक्षक जोगापूर वनविभाग राजुरा, एस. एम. धोटे प्राचार्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मंदा शंकर बुऱ्हाण राजुरा तालुका महिला संघटीका नेफडो, अरुणा सालवटकर, कोरपना तालुका महिला उपाध्यक्षा, नेफडो यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत गीत व नृत्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सादर केले. सत्कारमूर्तीना शॉल, श्रीफळ व वृक्षकुंडी भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. मेघा धोटे यांनी केले. प्रास्ताविक सुनैना तांबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. रजनी बोढे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशवितेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुराच्या पदाधिकारी, सदस्य,संघटक यांनी अथक परिश्रम घेतले. प्रविणा पडोळे उपनिरीक्षक पोलीस स्टेशन राजुरा परिस्थितीला न घाबरता येणाऱ्या प्रत्येक संधीचा स्वीकार करून आपल्या ध्येयापर्यंत पोहचावे. त्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपल्या आदर्श व्यक्तींच्या कार्य व जीवनशैलीचे सूक्ष्म निरीक्षण करून मिळालेल्या संधीचे सोने करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. माया राजुनंद गायकवाड वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय राजुरा आरोग्यम धनसंपदा याच बरोबर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करतांना चांगले कार्य, विचार, कर्तव्य याकडेही लक्ष द्यावे. रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा असून याकरीता शिक्षणाची दारे मोकळी करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्य व विचारांचा अंगीकार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
अंकिता बंडू नेव्हारे वनरक्षक जोगापूर वनविभाग राजुरा प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाचा वसा स्वीकारला पाहिजे. वन्यप्राणी, पशु पक्षी, जल, जंगल यांचे रक्षण करून नैसर्गिक संसाधनाचा वापर जपून केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
माधुरी साळवे या राजुरा येथील पहिल्या जेनेटरिक मेडिकल चालविणाऱ्या महिला असून त्यांनी अल्प दरात रुग्णांना औषध उपलब्ध करून देत आजारातून बरे झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू बघून आपल्या कार्याला अधिक गती दिली. तर एस. एम. धोटे प्राचार्य यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे अविरतपणे सेवा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करीत आहे. या कार्यक्रमाचा शेवट वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने करण्यात आला.

