मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
लोंढोली (ता. सावली) येथील दुर्धर आजाराने ग्रस्त राजू लक्ष्मण ठाकूर यांना पुढील उपचारासाठी आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.
या आर्थिक मदतीमुळे रुग्णाच्या उपचारासाठी मोठा आधार मिळाला असून, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे नेहमीच गरजू व पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे, ग्राम काँग्रेस लोंढोलीचे अध्यक्ष दिलीप लटारे, लोंढोलीचे सरपंच उष्टू पेंदोर, ग्रामपंचायत सदस्य राजू बोदलकर, धनवान बोदलकर तसेच काँग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

