माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या हस्ते महापूजा संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*एटापल्ली:-* तोडसा येथील देवस्थान बाबलाई माता येथे जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.या प्रसंगी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या शुभहस्ते बाबलाई माता महापूजा विधीवत पार पडली.
यावेळी राजे साहेबांनी समस्त बाबलाई माता भक्तांना जत्रा महोत्सव निमित्ताने शुभेच्छा दिल्या.!
जत्रा महोत्सवानिमित्त संपूर्ण परिसरात उत्साह,श्रद्धा व भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेऊन बाबलाई मातेकडे मनोकामना व्यक्त केल्या.
यावेळी बाबलाई माता जत्रा महोत्सव प्रमुख भिवा गावडे पेरमा,मिरवा गावडे पुजारी,श्री मालु मडावी कांदोळी पाटील,गोंगलु गावडे उडेरा पाटील,केशव गावडे भुमीया तुमरगुंडा,
प्रशांत लालू आत्राम जिल्हा सचिव आदिवासी आघाडी,गाव पाटील बुमिया शेंड्या,उसण्णा मेडीवार,योगेश कुमरे,बाबला मजुमदार,मनिष ढाली,प्रसाद पुल्लुरवार,अनुप सरकार,राजेश लोणकर,डोलु तिम्मा,कन्ना तिम्मा,तोंदे गावडे,अनिकेत मामिडवार,अविष्कार गड्डमवार,विकास तोडसाम,
तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

