ग्रामसेवकाचे दायित्व काय जनतेमध्ये प्रश्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी ==*
राजाराम :-अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत राजाराम येते तीन वार्ड असून तीनहि वार्डात एकूण आठ हातपम्प बंद अवस्थेत असून ग्रामपंचायत गेल्या एक दोन महिन्यापासून हातपंप नादुरुस्त आहेत.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत समोरील हातपंम्प बंद असून याकडे ग्रामपंचायतची दुर्लक्ष होत आहे. तसेच हर घर नळ यावे म्हणून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मार्फत जिल्हा परिषद कडून कोटी रुपये खर्च करून गेल्या वर्षी पाण्याची टाकी बांधण्यात आली व पंधव्या वित्त आयोगातून खर्च करून धातूरमातूर प्रत्येक घराला नळ जोळणी केले मात्र ते शुद्ध पाणी नागरिकांना मिळाले नसून आज एक दोन महिन्या पासून हातपंम्प बंद आहेत, यामुळे पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असताना याकडे ग्रामपंचायत कडून कानडोळा करीत सरस दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे त्वरित बंद असलेले हातपंम्प दुरुस्त करावी अशी मागणी केली जात आहे.

