बीड, परळीच्या श्रद्धा गायकवाडने पटकावले 36 व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक; फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धेतसाठी भारतीय संघाकडून झाली निवड.
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
बीड:- एखाद्याचे टॅलेंट हे पैश्या अभावी झाकून ठेवता येऊ शकत नाही याचे नुकतेच उदाहरण बीड जिल्ह्याच्या परळी येथील रहिवासी असणाऱ्या श्रद्धा गायकवाड या हिने सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या 36 व्या नॅशनल गेम्स मध्ये सुवर्णपदक पटकावणारी परळीची सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड हिची ऑलिम्पिक मध्ये निवड झाली.
परळीवासियांसाठी अतिशय अभिमानाची बाब म्हणजे परळीची कन्या कुमारी श्रद्धा गायकवाड हिने 36 व्या खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून फ्रान्समध्ये होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघात तिची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. ऑलम्पिक साठी निवड होणारी परळीतील ती पहिलीच खेळाडू ठरली आहे. अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या कु. श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने ‘स्केट बोर्डिंग’ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तिची ‘स्केट बोर्डिंग’ या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. रविंद्र गायकवाड हे परळी येथील भीमनगर येथील रहिवाशी असून ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात त्यांच्या कन्येने या क्रीडा प्रकारात घेतलेली आंतरराष्ट्रीय पातळीवरील परळीच्या अभिमानाची ठरली आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्विट करून अभिमानास्पद असून परळीचे नावलौकिक श्रद्धा ने वाढवला असल्याचे म्हटले आहे. “अभिमानास्पद! आमच्या परळीतील गायकवाड कुटुंबाची कन्या कु.श्रद्धाने अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्केटबोर्डिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारतीय ऑलिम्पिक स्थान निश्चित केले आहे.”

