हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो.9764268694.
बल्लारपूर:-19फेब्रुवारी २०२६ रोजी
नगर परिषद बल्लारपूर यांच्या वतीने शहरातील
छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ. अल्का अनिल वाढई यांनी
शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. मा. श्री. डॉ. अनिल वाढई
संचालक – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
तसेच बल्लारपूरचे मुख्याधिकारी (CO) श्री. विशाल वाघ यांनीही
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास नगर परिषदेतील सर्व कर्मचारी,
नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. तसेच सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली तसेच
राजमाता जिजाऊ
यांना वंदन करून कृतज्ञता व्यक्त केली. परिसरात उत्साह, अभिमान व शिवभक्तीचे पवित्र वातावरण निर्माण झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमाने
नागरिकांमध्ये प्रेरणा व राष्ट्रीय अभिमानाची भावना अधिक दृढ केली.

