Sunday, May 18, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन (गज्या ) मारणे व त्याचे साथीदार यांचेवर खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल चार साथीदारांना अटक करुन फिर्यादीची सुखरुप सुटका

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 9, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन (गज्या ) मारणे व त्याचे साथीदार यांचेवर खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल चार साथीदारांना अटक करुन फिर्यादीची सुखरुप सुटका
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी…

खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहर –

पुणे : तक्रारदार रा. सिंहगड रोड, पुणे यांचा रियल इस्टेट व शेअर ट्रेडींगचा व्यवसाय आहे. दि. ०७/१०/२०२२ रोजी तक्रारदार व त्यांचा मित्र यांना आय.सी.आय.सी.आय बैंक कात्रज, पुणे समोरुन काही अनोळखी इसमांनी जबरदस्तीने अपहरण करुन गाडीमध्ये बसवुन, मुंबई बेंगलोर हायवे रोडने रात्रभर वेगवेगळ्या गाडीमधुन फिरवुन, खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून, मारहाण करुन, तक्रारदार यांची गाडी जबरदस्तीने काढुन घेवुन त्यांचेकडे २० कोटीची मागणी केली होती. ती न दिल्यास तक्रारदार व त्यांचे घराच्यांना संपवुन टाकण्याची धमकी दिली होती. सदर घटनेमध्ये पुण्यातील कुप्रसिध्द गुन्हेगार गजानन मारणे याचा व त्याचे टोळीचा प्रत्यक्ष सहभाग असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना प्राप्त झाली होती. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सदर माहिती त्यांनी तात्काळ वरिष्ठांना देवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची दोन वेगवेगळी पथके तयार करुन कौशल्यपूर्ण तपास करुन अपहृत व्यक्तिची प्राधान्याने सुखरुप सुटका करण्यात आली.

त्यानंतर तक्रारदार यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेवून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून १) गजानन (गज्या) पंढरीनाथ मारणे रा.हमराजचौक शास्त्रीनगर कोथरुड पुणे व त्याचे इतर साथीदार २) रूपेश कृष्णराव मारणे रा. शास्त्रीनगर कोथरूड पुणे, ३) सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप रा. गोविंदराव पाटील नगर, धनकवडी पुणे ४) अमर शिवाजी किर्दत रा.एम.आय.डी.सी. कोडोवली ता.जि. सातारा. ५) हेमंत बालाजी पाटील रा. बुरली ता. पलूस जि.सांगली, ६) फिरोज महंमद शेख रा. समर्थनगर कोडोवली ता.जि. सातारा, ७) एक अनोळखी महिला व त्यांचे इतर तीन ते चार साथीदार इसम यांचे विरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं.६७१ /२०२२ भा.दं.वि. कलम ३९४.३६४ (अ), ३८६, ३८७,३८८, १२०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

नमूद गुन्हयामध्ये सहभागी असणारे इसम नामे १) सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, २) अमर शिवाजी किर्दत, ३) हेमंत बालाजी पाटील, ४) फिरोज महंमद शेख यांना तात्काळ अटक करण्यात आली असून इतर पाहिजे आरोपीतांचा शोध सुरु आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर हे करीत आहेत.

नमूद गुन्हयातील आरोपी गजानन (गज्या) पंढरीनाथ मारणे व इतर सह आरोपी यांचेविरुद्ध पुणे शहर, पुणे जिल्हा व इतर जिल्हयात खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण करून खंडणी उकळणे, दरोडा, गंदी मारामारी करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, अग्निशस्त्र व घातक हत्यार जवळ बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी गजानन मारणे याचेवर ३१ गुन्हे, रुपेश मारणे याचेवर १५ गुन्हे, सचिन घोलप याचेवर गुन्हे, हेमंत पाटील याचेवर ५ गुन्हे, अमर किर्दत याचेवर १ गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता, मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. श्रीनिवास घाडगे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री बालाजी पांढरे, गुन्हे शाखा युनिट ५ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहा. पो. निरीक्षक चांगदेव सजगणे, शैलेजा जानकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, अविनाश लाहोटे व पोलीस अंगलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, प्रमोद टिळेकर, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, वेतन आपटे, सुरेंद्र साबळे, विनोद शिवले, अकबर शेख, पवन भोसले, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.

Previous Post

संगमनेर शहरात अतिक्रमणांचा सुळसुळाट, रस्ते अरूंद झाल्यामुळे वाहतूक कोंडीत भर, नागरिक त्रस्त.

Next Post

नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा..

नाशिक:अंबड औद्योगिक वसाहतीत नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीसाठी शनिवारी निघणारा नाशिक ते मुंबई पायी मोर्चा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In