Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 29, 2026
in Uncategorized
0 0
0
HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो नं. 9420751809.

अहेरी =

भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, अहेरी येथे आज HPV (Human Papillomavirus) लसीकरणाबाबत पालक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये HPV विषाणू, त्यापासून होणारे आजार तसेच लसीकरणाचे महत्त्व याबाबत योग्य माहिती पोहोचवणे हा होता.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. लुबना हकीम (वैद्यकीय अधिकारी) व राशिद शेख (आरोग्य सेवक) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य शाहिद शेख सर यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ. लुबना हकीम यांनी आपल्या मार्गदर्शनात HPV विषाणू म्हणजे काय, तो कसा पसरतो, त्यापासून होणारे आजार (विशेषतः गर्भाशय मुखाचा कर्करोग) याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थिनींसाठी HPV लस किती महत्त्वाची आहे, ती कोणत्या वयोगटात घ्यावी, लसीचे डोस कसे दिले जातात व लसीकरण सुरक्षित व प्रभावी कसे आहे याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले.
राशिद शेख यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजना, लसीकरणाचे वेळापत्रक तसेच शासकीय स्तरावर उपलब्ध सुविधा याबाबत माहिती दिली. त्यांनी पालकांना आपल्या मुलींचे लसीकरण वेळेत करून घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व पालकांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत जनजागृती अधिक प्रभावी केली.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे HPV लसीकरणाबाबत जागरूकता वाढून विद्यार्थ्यांच्या आरोग्यदृष्ट्या एक सकारात्मक पाऊल उचलले गेले.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने उत्तम प्रकारे करण्यात आले व शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous Post

क्रिकेट कोचनेच केला अल्पवयीन मुलींची छेडछाड करत फासला गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा.

Next Post

मर्रीगुडम रस्त्याला अखेर मुहूर्त; पत्रकारांच्या पाठपुराव्याने कामास सुरुवात.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
मर्रीगुडम रस्त्याला अखेर मुहूर्त; पत्रकारांच्या पाठपुराव्याने कामास सुरुवात.

मर्रीगुडम रस्त्याला अखेर मुहूर्त; पत्रकारांच्या पाठपुराव्याने कामास सुरुवात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In