मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. न. 9420751809.
गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी असूनही अवैधरित्या दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्या विविध दारू विक्रेत्यावर यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हयातील मुद्देमाल अखेर उप पोलीस स्टेशन रेपणपली च्या पटांगणात नष्ट करण्यात आला. सदरचा मुद्देमाल उप पोलीस स्टेशन रेपणपली येथील 2024–25 मधील 22 गुन्ह्यातील व उप पोलीस स्टेशन जिमलगटा येथील 2025–26 मधील 29 गुन्ह्यातील होता. सदरची कार्यवाही मा. श्री. एम. रमेश साहेब पोलीस अधीक्षक गडचिरोली , अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान),(अहेरी) श्री. कार्तिक मधिरा सर, अप्पर पोलिस अधीक्षक, (प्रशासन) श्री. गोकुळ राज जी. सर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगटा श्री. राहुल मडावी सो.यांच्या उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक भास्कर कांबळे (प्रभारी अधिकारी) उप पोलीस स्टेशन रेपणपली,पोलीस उप निरीक्षक आनंद गिरी उप पो स्टे जिमलगटा यांनी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय अहेरी यांच्या व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक,गडचिरोली यांच्या परवानगीने केली. त्यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत असलेल्या जीमलगट्टा व रेपणपल्ली येथील एकूण 51 गुन्ह्यातील एकूण 35 लाख रुपयांचा देशी, विदेशी दारू व बियर असा मुद्देमाल नाश करण्यात आला. सदरची कारवाही दिनांक 05/05/2026 रोजी शासकीय पंच व राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक गडचिरोली प्र.निरीक्षक श्री.शुभम चौधरी व दुय्यम निरीक्षक श्री.चंदन भगत यांच्या समक्ष करण्यात आली. सदरचा मुद्देमाल नष्ट करताना जमिनीवर ठेवून त्यावर रोलर फिरवून चुरा करण्यात आला व जेसीबीच्या साह्याने खोल खड्डा खोदून मुद्देमालाचा चुरा खड्यामध्ये टाकण्यात आला. सदर कारवाईदरम्यान पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली.
*पुढील काळातही दारूविरोधी कठोर कारवाया करण्यात येतील असा इशारा देण्यात आला.*
