Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अहमदनगर : मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आरोपी सतीश बन्सी उमाप याला २० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 13, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अहमदनगर : मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आरोपी सतीश बन्सी उमाप याला २० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंडाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी

अहमदनगर : मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आरोपी सतीश बन्सी उमाप वय ३५, वर्ष राह. राहुलनगर, ता. पारनेर याला २० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी मोरे यांनी ठोठावली आहे.

सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील ॲड. मनिषा केळगंद्रे – शिंदे यांनी पाहिले. पीडित मुलगी ता. १२ सप्टेंबर २०१८ रोजी एका धार्मिक उत्‍वासानिमित्त सतीश बन्सी उमाप याच्या घरी गेली होती. सतीश याने तिला चाकू दाखवून धमकावले व त्यानंतर आरोपी याने मुलीवर अत्याचार केला. या घटनेचे त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग केले होते. सदरचे व्हिडीओ शुटींग पीडित मुलीला दाखवले व जर कोणाला काही सांगितले तर हे व्हिडीओ शुटींग व्हायरल करण्याची धमकी दिली होती. मुलगी गरोदर राहिली असल्याचे आईच्या लक्षात आले. आईने विश्‍वासात घेऊन माहिती विचारली. त्यानंतर मुलीने ता. १४ एप्रिल २०१ ९ रोजी पारनेर पोलिस ठाण्यात आरोपी सतीश बन्सी उमाप याच्या विरूध्द तक्रार दिली होती.

आरोपी विरूद्ध भा.दं.वि. आणि लैंगिक अपराध पासून बालकांचे संरक्षण कायदा तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्यवये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपास करून न्यायालयामध्ये आरोपीविरुध्द दोषारोपत्र दाखल केले. पीडित मुलीस गर्भवती होऊन बराच कालावधी झालेला होता. त्यामुळे गर्भपात करणे शक्य नव्हते. तिचे सिझेरीयन करून बाळंतपण करण्यात आले.

या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची साक्ष, डी. एन. ए. पुरावा महत्वाचा ठरला. विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा केळगंद्रे – शिंदे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला व सतीश उमाप याला २० वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रूपये दंड, दंड न भरल्यास १ महिना साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. पारनेर पोलिस ठाण्याचे हवालदार शिवनाथ बडे यांनी सहकार्य केले.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

अडपल्ली माल व चक येथे आमदारांनी जाणून घेतल्या समस्या; जनतेच्या कल्याणासाठी निधी खेचून आणू: आ.धर्मराव बाबा आत्राम

Next Post

नागपुर शहरात गोंड वस्तीत भूकबळीमुळे मृत्यू, पोटातील भुकेच्या आगीत त्यांचा सारा देह होरपळून निघाला अन् त्याने देह ठेवला.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपुर शहरात गोंड वस्तीत भूकबळीमुळे मृत्यू, पोटातील भुकेच्या आगीत त्यांचा सारा देह होरपळून निघाला अन् त्याने देह ठेवला.

नागपुर शहरात गोंड वस्तीत भूकबळीमुळे मृत्यू, पोटातील भुकेच्या आगीत त्यांचा सारा देह होरपळून निघाला अन् त्याने देह ठेवला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In