संवाद यात्रेत नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
मुलचेरा:- काही लोकप्रतिनिधी आपण केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचे काम करतात, अशा लोकांपासून जनतेने सावध राहावे, विकासकामांचे श्रेय घेऊन नव्हे तर जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करण्याकरिता विकास कार्य करायचे असते. क्षेत्राचा विकास हीच आपली प्राथमिकता असून जनतेच्या कल्याणासाठी पाहिजे तेवढा निधी शासनाकडून खेचून आणू,अशी ग्वाही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरू असून 11 ऑक्टोबर रोजी मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली माल व चक या गावांत संवाद यात्रा पोहोचली,यावेळी नागरिकांच्या समस्या जाणून घेताना ते बोलत होते.
या संवाद यात्रेत माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, माजी जि प सदस्य दौलतराव बाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, जिल्हा सचिव संजय कोचे,उपाध्यक्ष फहिम काझी, उपाध्यक्ष योगेश नांदगाये, माजी जि प अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, माजी बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलचेरा तालुकाध्यक्ष युधिष्ठीर बिश्वास सरपंच रेखा कन्नाके, उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम, ग्रा प सदस्य संदीप चौधरी, सरिता येलमुले, विध्यादर सागडे, भगिरथाबाई कुकुळकर, सुधाताई कुंदोजवार तसेच पुंडलिक चौधरी, विलास राऊत, इंदूबाई गेडाम, छत्रपती कुकुळकर, लक्ष्मण मडावी, धर्मापाल गोंगले, परशुराम वाढई, कालिदास कावळे, पोलीस पाटील परशुराम मोहूर्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.धर्मराव आत्राम यांनी मी मंत्री पदावर असताना 1992 ला चामोर्शी तालुक्याचे विभाजन करून मुलचेरा तालुक्याची निर्मिती केली.मुलचेरातील नागरिकांना विविध शासकीय कामासाठी चामोर्शी तालुक्यात जावे लागत होते. आता सर्व शासकीय कार्यालय मुलचेरा तालुका मुख्यालयात झाल्याने येथील जनतेला सोयीचे झाले आणि चामोर्शी तालुक्यातील पायपीट थांबली.
सलग दोनदा नवीन चेहऱ्यांना संधी दिल्यावर पुन्हा एकदा अहेरी विधानसभेतील मतदारांनी मला कौल दिला,माझ्यावर विश्वास दाखविला. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही.अडपल्ली माल आणि चक वासीयांनी ग्रापंचयातच्या निवडणुकीत एकहाती सत्ता दिली. यापुढेही असेच भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहा उर्वरित प्रश्नही मार्गी लागतील असेही आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी ग्वाही दिली.
भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते समाज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन
अडपल्ली माल येथील नागरिकांच्या मागणीनुसार येथे भव्य समाजमंदिर बांधकामासाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी निधी मंजूर करून दिली आहे. त्याचे भूमिपूजन 11 ऑक्टोबर रोजी भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. आता भव्य समाजमंदिर उभं केला जाणार आहे. भूमिपूजन सोहळ्यात अडपल्ली माल येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

