लेखिका:- प्रिया मेश्राम, नागपूर
“तुझ्या जातींचे लोक अशीच असतात” हे वाक्य ऐकून. जात थेट मस्तकात गेली. जे अस्तिवात नाही तोच तोच पुराण घेऊन परंपरा का चालवताय? माणुसकी सारखं सुंदर नातं या भूतलावर कुठेच नाही.
तिला विचारलं, “कशी आहेस?” ती रडायला लागली आणि श्वास घेत म्हणाली, “तूझ्या जातीची माणसं चांगली नाही. प्रेम विवाह करूनही. शेवटी त्याने, त्याच्या घरच्याने मी दुसऱ्या जातीची म्हणून गुन्हेगारासारखं वागवलं. अंथरुणात खिळलेय पण प्रेम करणाऱ्या नवऱ्याला माझी किव आली नाही. नंदा, सासू, सासरे सर्व मला अपशब्द बोलून, जात काढून काढून सारखे त्रास देतात. सर्वांना फक्त मी कमवलेला पैसा हवा आहे आणि मी मोलकरीण सारखी काम करणारी हवी आहे. मला कितीही त्रास होऊ दे.. कोणीही विचारपूस करतं नाही. मदत करतं नाही. जनावरासारखं मारतो गं तो…! तरीही नवरा म्हणून त्याच्यावरच प्रेम कमी केल नाही. फाटलेले कपडे बघून उलट मीच त्याला सर्व घेऊन देते. “
ती रडून शांत झाली. पण माझे विचारक्र सुरु झाले. केवळ जातीवरून तूच्छ लेखायचं. वाडीत टाकायचं. ही वागणूक कोणती स्त्री सहन करेल? का म्हणून तिने सहन करावं? प्रेम केल तिने. त्याची जात बघून प्रेमात पडली नाही. आयुष्यभर साथ देण्यासाठी केल. अजूनही जातीवरून लहान मुलांना पाणी पिलं म्हणून मारहाण, प्रेम केल म्हणून खून, अनेक घटना घडतं आहे. कुठे किराणा देण्यास सक्त मनाई केली आहे.
जी जात नावाची कीड मानसिक रूपात स्वतःच्या मेंदूत रोवून जिवंत माणसाची विटंबना केली जातेय. तिथे प्रश्न आहे. रक्त तिचं एकटीच नव्हतं. मुलाचंही होत. तो कसा शुद्ध राहिला? कुठे जात नावाचा लोगो जन्मत: चिपकून आलंय अजूनही सिद्ध केल नाही कोणी. फक्त अन्याय करतांना अभिमानान व सत्ता इतकं यांना कळत. जीव जातपर्यंत जात महत्वाची असेल तर त्यांनी माणसात नाही, प्राण्यात नाही.. कुठेही राहू नये.थेट स्वतःच जीव घ्यावं. या सृष्टीवर जन्म घेणाऱ्याला मनसोक्त, स्वच्छदी जगण्याचा अधिकार आहे. तो हिरावून घेणारे तुम्ही कोण?
जात हा शब्दच मुळात फक्त कीड आहे. आपल्या घरात, मनात, नात्यात, समाजात जिवंत असेल तोपर्यंत एकमेकांना फक्त शोषण, छळण असेल. आज दुसऱ्याची मुलगी, कधी आपली मुलगी.. कोणत्या तरी प्रसंगी हे अन्याय घडून येणारच.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348
देशातल सत्य आणि विदारक चित्र आहे