मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
दिंडोरी : नाशिक जिल्हा हा कृषी पंढरी म्हणून ओळख असलेला नाशिक जिल्हा आहे. शेतकरी वर्गाचे द्राक्ष व भाजीपाला, कांदा सोयाबीन ही पिके मुख्य असून पावसाने शेतीची आणि भाजीपाल्यांची वाट लावल्याने संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा आजच्या या बनावट की ओरिजनल अशा संकटात सापडला आहे.
बळीराजा आपल्या शेतीची सुरुवात खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकर्यांकडून किटकनाशकाची मोठ्या प्रमाणात खरेदी करून पिकांची काळजी घेण्याच्या दृष्टीने तयारी करत असतो. कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन अॅप्लीकेशन प्रा.लि.च्या आवारात बनावट किटकनाकाचा साठा असल्याचा संशय कृषी विभागाला आल्यामुळे कृषी विभागाने तात्काळ कारवाई केली आहे. अधिकृत किटकनाशके विक्रेते यांचे व्यतिरिक्त शेतकर्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट किटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता.
त्यादृष्टीने कृषी विभागाने सापळा रचून विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांचे आदेशानुसार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सोनवणे, तंत्र अधिकारी गु.नि संजय शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली नितेंद्र पानपाटील, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांचे सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत घुमरे यांनी ही कारवाई केली. जिल्हा भरारी पथकाने बनावट किटकनाशकाचा सुमारे २९५ किलो/लिटरचा साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य सुमारे रु. ६.१६ लाख एवढे आहे.
कारवाईच्या वेळी कृषी अधिकारी पंचायत समिती दिंडोरीचे दीपक साबळे, कृषी अधिकारी, पंचायत समिती दिंडोरी हे उपस्थित होते व संशयीत दीपक मोहन अग्रवाल यांच्याविरुद्ध किटकनाशक कायदा १९६८, किटकनाशक नियम १९७१, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत अभिजीत घुमरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नाशिक यांनी पोलीस ठाणे दिंडोरी येथे फिर्याद क्रमांक गु.र.नं ३४६/२२ दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

