मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
याप्रकरणी आडगाव पोलिसात संशयित कार चालका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली आहे. सदर घटना गेल्या गुरुवारी ता.१३ रात्री घडली. प्रवीण शिवाजी पेखळे 40, रा. सर्व्हिस स्टेशन, माडसांगवी, नाशिक असे संशयित कारचालकाचे नाव आहे.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी ता.१३ त्या लासलगावी मामाच्या गावाला जाण्यासाठी औरंगाबाद रोडवरील नांदूर नाका येथे वाहनाची वाट पाहत थांबलेल्या होत्या. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित पेखळे कारमधून एमएच 04 जीझेड 8709 सायखेडा चौफुलीच्या दिशेने जात असताना, पीडितेने लिफ्टसाठी हात दाखविला. त्याने कार थांबवून लिफ्टसाठी पीडितेला कारमध्ये बसविले.
मात्र, त्याने पीडितेशी गैरवर्तन करुन अश्लिल हावभाव करत महिलेचा विनयभंग केला. गैरवर्तन केल्यानंतर पेखळे याने पीडितेला बलात्कार करण्याची धमकीही दिली. त्यानंतर तिने टोलनाक्यावर गाडीचा वेग कमी होताच आरडाओरडा केला. यावेळी टोल नाक्यावरील कर्मचारी पीडितेच्या मदतीसाठी धावून आले.
तरीही संशयिताने पीडितेला जबरदस्तीने गाडीत ओढून घेतले. त्यानंतर आडगाव पोलिसांनीही तत्परता दाखवत घटनास्थळ गाठले. संशयिताने पोलिसांनाही शिवीगाळ केली. याप्रकरणी संशयिता विरोधात आडगाव पोलिसात विनयभंगासह पोलिसांना शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितास पोलिसांनी अटक केली असून आडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अरुण पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट ला www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

