गोंडपिपरी धाबा हा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने खवळले भाजपा कार्यकर्ते
राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:- जिल्हातील गोंडपिपरी-हिवरा मार्गाच्या कामाला मंजुरी मिळून वर्ष लोटली. पण या मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराची मुजोरी अन् प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी चंद्रपूर
जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका भाजपने (BJP) आज चक्का जाम आंदोलन केले. त्यांच्या सोबत ऑटो युनियनही रस्त्यावर उतरली.
अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. तरुणांना कायमचे अपंगत्व आले आहे. मार्गाच्या दुरवस्थेने ऑटोचालकांच्या व्यवसायात कमालीची घट झाली आहे. वारंवार मागणी करूनही या मार्गाचे काम पूर्ण होत नसल्याने आज गोंडपिपरी तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ऑटो चालक संघटना सहभागी झाली. गोंडपिपरी ते हिवरा या मार्गाच्या कामाला अडीच वर्षापूर्वी मंजुरी मिळाली. पण अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. गोंडपिपरी ते धाबा हे केवळ बारा किलोमीटरचे अंतर आहे. पण हा मार्ग कापण्यासाठी तासभर वेळ लागतो. नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघातात होत असलेल्या वाढीने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. असे असताना कंत्राटदाराच्या मुजोरीने या कामास विलंब होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
या रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत विविध पक्षांनी आंदोलने केली. पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे याप्रकरणी आता गोंडपिपरी तालुका भाजप आक्रमक झाली आहे. त्यांनी गोंडपिपरी-धाबा मार्गावरील डोंगरगाव फाट्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. आज माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, पंचायत समितीचे माजी सभापती तथा भाजपचे जिल्हा सचिव दिपक सातपुते, वैष्णवी बोडलावार, नंदा घोगरे, किशोर अगस्ती, स्वप्निल अनमुलवार, रोशनी अनमुलवार, निलेश पूलगकार, हिराचंद कंदकुरीवार,अरूण कोडापे, संतोष मुगलवार, सरपंच सौ मंगला साजन झाडे, परशुराम कुबडे, राजू गोहणे, बाबूराव बोमगंटीवार, चंपत कोसरे, निलकंठ भाऊ लखमापूरे विलास वाघाडे राजेंद्र झाडे हे रस्त्यावर उतरले. अन् लगेच त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केले.
तहसीलदार के. डी. मेश्राम, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता वैद्य, ठाणेदार सुशील धोकटे हे आंदोलनस्थळी पोहोचले. येत्या १ तारखेपासून कुठल्याही स्थितीत कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याने दोन तास चक्काजाम केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गोंडपिपरी-हिवरा मार्गाची अवस्था अतिशय वाईट आहे. अडीच वर्षांपूर्वीपासून सुरू झालेले काम अजूनही पूर्ण झाले नाही. यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप होत असून ऑटोचालकांच्या व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपसह आमची संघटना चक्काजाम आंदोलन करीत आहोत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे, अशी आमची मागणी हिराचंद कंदकुरीवार, उपसरपंच धाबा तथा सचिव ऑटो युनियन गोंडापिपरी. यांनी केली आहे.