मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आपली विवाहित प्रेमिका घरी एकटीच असल्याची संधी साधत एका प्रेमविराच्यावल दुर्दैवी अंत झाला त्यामुळे सर्विकड एकच खळबळ माजली आहे.
पती घरी नसल्याने एका विवाहित प्रेमिका असलेल्या महिलेला भेटण्यासाठी तिचा प्रेमी घरी आला, पण अचानक महिलेचा पती घरी आल्याने आपल बिंग फुटेल आणि घरात कुठेच लपण्यासाठी जागा मिळत नसल्यामुळे आपल्या अनैतिक प्रेम संबंधाच पितळ उघड पडू नये म्हणून ३६ वर्षीय प्रियकाराने आपल्या प्रेमिकेच्या घरच्या गॅलरीमधून इमारतीच्या दुसर्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरावाडी कमलनगरमधील ३६ वर्षीय युवकाचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. प्रेयसीचा पती घरी नसल्याचा फायदा घेत संधी साधत प्रियकर तिच्या घरी आला होता. त्यांचे प्रेमाचे हितगुज सुरू होते. पण अचानक प्रियसीचा पती काहीच न कळवता घरी आल्याने दोघेही हादरले, त्या दोघांचीही पळापळ झाली. घरात लपण्यासाठी योग्य जागा काही भेटेना त्यामुळे त्यांची भीती अधिक वाढली. आज आपल भांड फुटणारच या भीतीने आणि प्रियकराला लपण्याची किंवा घराबाहेर जाण्याचीही संधी न मिळाल्याने त्याने पिक्चर स्टाईल शक्कल लढवत थेट गॅलरीतून खाली उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय प्रियकराला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र, दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

