सौ.हनिशा दुधे बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- स्वतंत्र सेनानी, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांना दिनांक 21 ऑक्टोबर 2022 ला जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम सर, प्रमुख उपस्थित श्री. एम. डी. टोंगे माजी मुख्याध्यापक होते.
प्रथमता: उपस्थित मान्यवरांनी शहीद वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या फोटोला माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. आर. बी. अलाम सर यांनी शहीद वीर बाबुराव पुल्लसुर शेडमाके यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषण श्री. बी. बी. भगत सर मुख्याध्यापक यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन श्री. आर. के. वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. एस. एम. लोधे मॅडम यांनी केले. कार्यक्रमात श्री. यु. के. रांगणकर सर, श्री. एस. एम. चव्हाण सर, श्री. दिनेश भाले बाबु, श्री. जगदीश कांबळे, श्री. वामनराव बोबडे, श्री. सुरेश मोरे, श्री. वाल्मीक खोंडे, श्री. इंद्रभान अडबाले आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहित पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

