राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
गोंडपिपरी:- डोंगरगाव येथे आज दिनांक 21 ऑक्टोबरला विर शहीद 1857 च्या लढ्यातील क्रांतिकारक विर बाबूराव शेडमाके यांनी ब्रीटीशा विरोधात लढण्याकरीता विर बाबूराव शेडमाके यांनी “संगोम सेनेची “स्थापना केली. घोट, अडपल्ली व इत्तर गावामधून जवळपास 500 आदीवासी तरुण त्यांनी यासाठी जमा केले युवकांची फौज उभारुन त्यांनी आदीवासी युवकांना गनीमी काव्याचे प्रशिक्षण दिले.
आदीवासी ना ब्रिटीशा विरोधात लढण्यास तयार केले. हा कार्यक्रम डोंगरगाव येथील भर चौकात आज साजरा करण्यात आला या सदर कार्यक्रम ला डोंगरगाव येथील समस्त नागरीक उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र संदेश न्युज चे प्रतिनिधी व डोंगरगाव येथील ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र झाडे यानी केले व प्रास्ताविक माझे मीत्र महेश मडावी सदस्य ग्राम पंचायत डोंगरगाव यांनी केले या कार्यक्रमाला गावातील नागरिकांना मार्गदर्शन करतांना महेश मडावी यानी संबोधले.
हक्कांच्या स्वातंत्र्या साठी चंद्रपूर च्या माटीपुत्राणी हसत हसत आपला जिव गमावला आणी इतीहासात अमर झाला. जरी आमच्या इतिहास काराणी त्यांचे नाव, काम, त्याग कमी लेखले असले तरी ते या विरांची विरता नाकारू शकत नाही असे सूंदर प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य यांनी केले या कार्यक्रमला डोंगरगाव येथील समस्त नागरिकांनी सहकार्य केले.

