पिढीत अल्पवयीन मुलीची स्थिती गंभीर रुग्णालयात दाखल.
✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- संपूर्ण देशवासीय दिवाळीचा महोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत असताना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला तिचाच वाढदिवसाच्या दिवशी जबरदस्तीने दारू पाजून 3 नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आमानूष प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पिढीत मुलीची परिस्थिती गंभीर असल्याने तिला हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अजुन पर्यंत तिची स्थिती सुधारली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सुत्रा कडून प्राप्त झाली आहे.
पिढीत मुलीने दिलेल्या माहितीनुसार,
21 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवस होता. त्यामुळे माझी एक मैत्रीनिने मला फोन केला आणि केक घेण्यासाठी तिने मला डॉ. जोगनपुत्राचा रुग्णालयासमोर ये मी तुला तिथेच भेटणार अस ती मला बोलली. बराच वेळ मी तिथे थांबली पण ती आली नाही. मग काही वेळेनंतर तिथे सुजित गावंडे आणि आकाश वर्मा आले. त्याने जबरदस्तीने रुमालने माझे तोंड दाबून मला स्कुटी वर बसवलं आणि महाकाली नगरी येथे नेले त्यांनी तिथे मला जबरदस्तीने दारू पाजली. दारू पाजल्यामुळे मला मोठ्या प्रमाणात नशा झाली होती. त्यांनी मला परत स्कुटी बसवलं आणि नांदगाव परिसरात मातोश्री नगरीत असलेल्या एका बंड्यात नेल. दारू पाजल्यामुळे मी तिथे पूर्णत बेहोश झाली. चार वाजताच्या दरम्यान मला होश आला त्यावेळी बघितल तर माझ्या शरीरावर एक पण कापड नव्हता मी तिथे तिघ जन होते. अक्षय थूल, सुजित गावंडे व आकाश वर्मा हे होते. अक्षय थूल माझ्या अंगावर होता. सुजित गावंडे याने माझे पाय पकडले होते, आकाश वर्मा याने माझे हाथ पकडुन ठेवले होते. मी त्यांना विनंती करत होते मला जाऊ द्या. त्यावेळी तिथे मला माझी मैत्रीण दिसली मी तिला बधल जॉब विचारला तर तिनेच मला बेहोशी मध्ये कपडे घालून दिले. मग मला स्कुटीवर बसून माझ्या घराचा परिसरात आरोपीने सोडून ते आरोपी तिथे चालला गेला ही माहिती पिढीत मुलीने महाराष्ट्र संदेश न्यूज ला दिली.
17 वर्षाच्या या अप्लवयीन मुलीवर नराधमाने केलेल्या सामूहिक बलात्कारा नंतर मुलीची स्थिती गंभीर होती तिला हिंगणघाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून आता तिची स्थिती सुधारत आहे. पण मनावर लागलेली जखम कधी सुधारेल हे सांगता येत नाही.
पोलीस तपासावर आई वडिलांना प्रश्न चिन्ह?
पिढीतेचा आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत तिच्या बरोबर 3 मुलांनी व तिच्या मैत्रिण हिने संगमत करून अत्याचार केला अस सांगितलं आहे. पण हिंगणघाट पोलिसांनी फक्त एक आरोपीला आकाश वर्मा या एकच नराधमाला अटक केेल इतर आरोपी बाहेर घुमत आहे. त्यामुळे पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न तर नाही करत आहे. अस आम्हाला वाटत आहे. आम्ही खूप गरीब आहोत माझी मुलगी मागील 4 दिवसापासून दवाखान्यात आहे. तिची स्थिती गंभीर आहे.
आज शहरात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकरणांत पोलिसांनी कुठलीही हायगत नकरता पिढीतेला न्याय द्यावा असे काही सामाजिक कार्यकर्त्या यांचे म्हणणे आहे.

