मानवेल शेळके, नशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नोकरीत पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून एकाने युवतीवर अत्याचार करून तिला मारहाण करीत दमदाटी केली प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पीडितेने गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित सागर मधुकर कदम 29, रा. कॉलेजरोड याच्याविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली . पीडिता ही कॉलेज रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये कामास असून, तेथील सागर कदमने पीडितेस पदोन्नती देण्याचे आमिष दाखविले. दि. 12 ते 22 ऑक्टोबरदरम्यान त्याने पंचवटीतील एका गेस्ट हाउसवर नेत तिच्यावर अत्याचार केले. त्याचप्रमाणे हा प्रकार कोणाला सांगू नको, असे धमकावत तिला मारहाण केली. या प्रकरणी गंगापूर पोलिस तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348