मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक पुणे महामार्गावरुन नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने विद्युत खांबाला जोरदार धडक दिल्याने. या धडकेत दोन ते तीन विद्युत खांब जागीच वाकून गेले आहे या अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये शिवशाही बसने एका रिक्षाला सुद्धा धडक दिली आहे. या अपघातात चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाता नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीला चक्क अक्सिलेटर ला एका दोरीचा सहारा दिल्याची बाब उघडकीस आली आहे. मंगळवारी देखील याच ठिकाणी शिवशाहीबसचा अपघात झाला होता. एकूणच नाशिक-पुणे महामार्गावर अपघात रोखण्यासाठी लेन कटींग बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच दरम्यान शिवशाही बसचा अपघात झाल्याने यामागील कारणं काय आहेत याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
राज्यात शिवशाही आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात कंत्राटी चालक आणि वाहक भरण्यात आले होते, त्यामुळे बस चालवतांना कुठली ही काळजी घेतली जात नाही अशी प्रवासी तक्रार करत होते.
असे असतांना शिवशाही बसच्या अपघातांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढली होती, अशातच लालपरी नंतर शिवशाही चांगली बस म्हणून समोर आली होती.
अशातच शिवशाहीचे अपघात आणि अक्सिलेटर ला एका दोरी बांधल्याचा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लालपरी नंतर शिवशाही बसची अशीच अवस्था होणार असेल तर प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून अपघाता प्रकरणी चौकशीची मागणी केली जात आहे.
अक्सिलेटर ला एका दोरीचा सहारा दिल्याची बाब समोर येत असतांना ब्रेकजवळ दगड ठेवल्याचे देखील दिसून येत आहे, त्यामुळे दोरीचा प्रकार आणि दगड कशासाठी ठेवलेले होते असा सवाल आता प्रवासी वर्गातून विचारला जात आहे.

