मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गुड्डीगूडम :- अहेरी तालुक्यातील गुड्डीगूडम येथील अनाथ मुलांना टायगर ग्रुप गुड्डीगूडम शाखेच्या वतीने दिवाळी भेट म्हणून शैक्षणिक साहित्य भेटवस्तू देण्यात आले. या उपक्रमासाठी टायगर ग्रुपने पुढाकार घेतला आहे.
टायगर ग्रुप आलापलीचे पदाधिकारी दौलत रामटेके, साई तुलसीगीर, श्रीकांत जिल्लेवार यांच्या पुढाकाराने टायगर ग्रुप गुड्डीगूडम चे पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आई वडील नसलेल्या अनाथ नागराज पेद्दी व सुशांत पेद्दी असे दोन विध्यार्थ्यांची आणि त्यांचा कुटुंबाचे आर्थिक समस्याची अडचण लक्षात घेऊन या दोन विध्यार्थ्यांना शालेय बॅग, नोटबुक, पेन, पेंशील, कंपास, कपडे, विविध प्रकारचे खाऊ असे दिवाळी भेट म्हणून भेटवस्तू देण्यात आले.
या प्रसंगी सरपंच सरोजा पेंदाम, सामाजिक कार्यकर्ते अनिल पेंदाम टायगर ग्रुप गुड्डीगुडमचे अध्यक्ष तुषार बोगामी, सदस्य रुपेश पेंदाम, श्रीकांत सडमेक, प्रफुल पेंदाम, प्रशांत सडमेक, कोमल बोगामी, विश्व हिंदू परिषदचे जिल्हा कार्यकर्ते राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, आर्यन चिंतलवार आदी सदस्य आणि कुटुंबातील सदस्य आणि गावकरी उपस्थित होते.

