फराळ साहित्य, ब्लॅंकेट व खाऊचे वितरण. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा उपक्रम.
संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
राजुरा:- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुराच्या वतीने लक्कडकोट – कोष्टाळा मार्गावरील बगलवाही कोलाम आदिवासी गुड्यावर दीपोत्सव – 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल चव्हाण, ठाणेदार, पोलीस स्टेशन विरुर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून गोरे, क्षेत्र सहायक, कोष्टाळा, मारू भिमु कुमरे, गावं पाटील, नरेश लाडसे, वनरक्षक, विजयकुमार जांभूळकर, नागपूर विभाग अध्यक्ष, संतोष देरकर, जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर, संदीप आदे, जिल्हाध्यक्ष,वन्यजीव संवर्धन समिती, आशिष करमरकर, जिल्हाध्यक्ष युवा, मंदा सातपुते, बबलू चव्हाण, जिल्हा सचिव युवा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला करुणा गावंडे – जांभुळकर यांनी “हिच आमुची प्रार्थना” हे गीत सादर केले. मोहनदास मेश्राम यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना म्हटली. बगलवाही येथील कोलाम आदिवासी बांधवाना चकली, चिवळा आणी लाडू अशी किट, ब्लॅंकेट, कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तेलीवार, तालुकाध्यक्ष यांनी केले. तर प्रास्ताविक बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी केले. आभार मोहनदास मेश्राम, तालुका उपाध्यक्ष यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्रवंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समिती, वन्यजीव संवर्धन समिती, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.
राहुल चव्हाण, ठाणेदार, वीरूर
मूल्यशिक्षणाच्या माध्यमातून मानवात अनेक बदल घडत असतात. दुसऱ्याला लागलेली भूक जोपर्यंत स्वतः आपण अनुभवत नाही तोपर्यंत सेवाकार्य आपल्या हातून घडत नाही. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने दरवर्षी नियमितपणे दीपोत्सव हा उपक्रम आदिवासी कोलाम गुड्यांनावर साजरा केला जातो. सामाजिक बांधिलकी जोपासुन या संस्थेमार्फत होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेचा खारीचा वाटा उचलल्या जातो ही कौतुकास्पद बाब आहे.

