पिढीत मुलीच्या आईने राज्य सरकारला दिलेल्या निवेदनातून केली सी.आय.डी मार्फत तपासाची मागणी.
✒️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- संपूर्ण राज्यात हादवणाऱ्या हिंगणघाट येथील दलीत समाजाच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार प्रकरणी पिढीत मुलीच्या आईने पोलिसांचा तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे या संतापजनक घटनेची उच्च स्तरीय किंव्हा सी.आय.डी मार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
संपूर्ण राज्य दिवाळीचा महोत्सव उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत असताना दि. 21 ऑक्टोंबरला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून संपूर्ण राज्याला हादवणारी घटना समोर आली होती. अवघ्या 17 वर्षांच्या अल्पवयीन दलीत मुलीला तिचाच वाढदिवसाच्या दिवशी जबरदस्तीने दारू पाजून अक्षय थूल, सुजित गावंडे, आकाश वर्मा या नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर पिढीत मुलीची परिस्थिती गंभीर असल्याने तिला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होता. आता त्या पिढीत मुलीची स्थितीमध्ये सुधार होत आहे. पण तिच्या बरोबर झालेली दरिंगीचे घाव अजुन तिच्या मनावर कायम आहे.
हिंगणघाट पोलिसांचा वेळकाढू पना..
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात हिंगणघाट पोलिसांनी वेळकाढू पना केला. जेव्हा काही सामाजिक कार्यकर्ते यांनी याबाबत आंदोलने केली आणि वर्धा जिल्हाचे नव नियुक्त पोलिस अधीक्षक याची भेट घेऊन त्यांना कारवाई करण्या बाबत निवेदन दिले होते. त्यानंतर हिंगणघाट पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणात आरोपीवर विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडी मध्ये आहे.
पिढीत मुलीच्या आईने……
माझ्या मुलीबरोबर तिच्याच वाढदिवशी अक्षय थूल, सुजित गावंडे, आकाश वर्मा या नराधमांनी जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक अत्याचार केला आणि त्या अत्याचाराचा व्हिडिओ पण बनवला माझी मुलगी पोलिसात दिलेल्या बायानात वारंवार सांगत होती की, तिच्या बरोबर कट करून हा सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. पण पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता नराधम आरोपीवर कारवाई करण्यात खूप उशीर केला. त्यामुळे आरोपींना सबुत मिटवण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. त्यामुळे आम्ही राज्य सरकारकडे अशी मागणी करतो की माझ्या मुलीवर झाले सामूहिक अत्याचाराची सी.आय.डी मार्फत तपास करून आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.

