Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

पुन्हा महाराष्ट्राचा एक प्रकल्प गुजरातने पळवला, राज्य सरकारवर विरोधी पक्षाचा हल्लाबोल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
October 29, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
पुन्हा महाराष्ट्राचा एक प्रकल्प गुजरातने पळवला, राज्य सरकारवर विरोधी पक्षाचा हल्लाबोल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- साधारण 22 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असताना हा प्रकल्प गुजरातला होत आहे. महाराष्ट्रात येणारे अनेक प्रकल्प हे अन्य राज्यात पळवले जात आहेत, ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक आहे, असे मत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. हा प्रकल्प नाशिकच्या एचएएल कंपनीत राबवावा, अशी मागणी टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याकडे ऑक्टोबर 2021 मध्ये पत्राद्वारे केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात वादंग उठले आहेत. या प्रश्नी भुजबळ यांनी शुक्रवारी दि. 28 पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, अनेक प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राला डावलले जात आहे. ही बाब महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक असून, महाराष्ट्रातील तरुणांनी केवळ मोर्चे, दहीहंडी, आणि फटाके फोडणे इथपर्यंतच मर्यादित राहायचे का? असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर 2021 मध्ये देशात गुंतवणुकीसाठी एअरबस कंपनीशी 22 हजार कोटी रुपयांचा करार केला होता. विमान तयार करणार्‍या या कंपनीचे काम टाटा कंपनीकडे आले. त्यानुसार 31 ऑक्टोबर 2021 ला हा प्रकल्प नाशिकच्या ओझरमध्ये कार्यरत असलेल्या एचएचएल या अनुभवी कंपनीत राबविण्यात यावा, आपल्याला आवश्यक सर्व सोयीसुविधा देऊ, असे विनंती पत्र रतन टाटा यांना दिल्याची आठवण सांगताना, हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने दुःख झाल्याचे भुजबळांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लवकरच मोठा प्रकल्प केंद्राकडून गिफ्ट मिळणार आहे, असे सांगितले. मात्र एकामागे एक प्रकल्प इतरत्र जात असल्याची टीका भुजबळांनी केली आहे .महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणार्‍या नेत्यांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालताना, यापुढे किमान कुठलाही प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही. तसेच अधिक गुंतवणूक येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही ते या वेळी म्हणाले.

Previous Post

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी लोहखनिज प्रकल्पात अपघात ट्रॅक्टरचालक ठार.

Next Post

संतापजनक: दिवाळीच्या दिवशी गायच्या तोंडात फटका फुटल्याले गायीचा तोंड झाल पूर्णत्व उद्धवस्त.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संतापजनक: दिवाळीच्या दिवशी गायच्या तोंडात फटका फुटल्याले गायीचा तोंड झाल पूर्णत्व उद्धवस्त.

संतापजनक: दिवाळीच्या दिवशी गायच्या तोंडात फटका फुटल्याले गायीचा तोंड झाल पूर्णत्व उद्धवस्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In