प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्यूज
कानपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दिवाळीचा फटाका तोंडात फुटल्यानं एका गायीचा तोंडचं उद्ध्वस्तच झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याच्या व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे.
गुरुवारी एक व्हिडिओ सोशल माध्यमामध्ये व्हायरल झाला त्यात एका गायच्या तोंडात फटाका फुटला त्यामुळे त्या गायच तोंड पूर्णत गंभीररीत्या जखमी झाल्याचे त्या व्हिडिओ मधून दिसून येत आहे. यानंतर स्थानिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली आहे.
कानपूरचे स्थानिक पोलीस याप्रकरणाची चौकशी करत आहेत. यामध्ये कोणीतरी खोडसाळपणाच्या उद्देशानं हे अघोरी कृत्य केलंय की, रस्त्यावर पडलेला फटाका या गायीनं खाल्ला हे तपासलं जाणार आहे. प्राथमिक तपासात हे स्पष्ट झालंय की, तोंडात फटाका फुटल्यानंच गायीच्या जबड्याला दुखापत झाली आहे. पण व्हिडिओतील घटनास्थळ स्पष्ट होत नसल्यानं पोलिसांच्या तपासात अडथळे येत आहे.
या घटनेची सत्यता तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. जर कोणी जाणूनबुझून हा खोडसाळपणा केला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. तसेच त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तसेच दुसरीकडं महापालिकेनं या गायीवर उपचार सुरु केले आहेत.
व्हिडिओमध्ये संबंधित गाय ही कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ उभी असलेली दिसून आली. त्यानुसार पोलिसांना असाही अंदाज आहे की, या गायीनं कचऱ्यात पडलेलाच एखादा पेटता फटाका खाल्ला असावा.

