✒️प्रशांत जगताप
गोंदिया:- पुरातन काळात “एकलव्या आंगठा” कापला गेला, अन हजारो वर्षापासून सर्व सामान्याचे शिक्षणाचे दोर कापले गेले, हे प्रतीक पुन्हा पुन्हा पुतल्याचे स्वरुपात सर्वांच्या मनात ठसत राहिले. पुन्हा कोणाचाही अंगठा कापला जाणार नाही हे वचन राखन्यासाठीच जणू सावित्री व ज्योतिबाचा जन्म झाला. त्यांच्या अथक प्रयत्नाने पुन्हा वंचितांच्या जीवनात शिक्षणाची गंगा वाहु लागली, ती सतत तशीच वाहू दे.
दिनांक 28 ऑक्टो 2022, गोंदिया जिल्ह्यतील सड़क-अर्जुनी तालुक्यातील खोडशिवानीमध्ये एकलव्याचे पुतळयाचे अनावरण कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार मनोहरराव चन्द्रिकापुरे, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संघर्ष वाहिनीचे दीनानाथ वाघमारे (सामाजिक कार्यकर्ते), प्रमुख वक्ता म्हणून प्रा योगेश दूधपचारे, सामाजिक कार्यकर्ते संजय केवट, संघर्ष वाहिनीचे गोंदिया जिल्ह्याचे संयोजक उमराव मांढरे, गोपीचंद कुम्भले, परेश दुरुगवार, मनीराम मौजे, शिवपाल चन्ने, नागपुरे (वन विभाग), इत्यादी पाहुण्यांसह गांवतील समाज बांधवांची उपस्थिती होती.
मछिमार समुदायला अनुसूचित जातीच्या सूचित समाविष्ट करावे, मछिमाराच्या जीवनात बदल हवे असतील तर नवीन तंत्रदनयान वापरून त्यांच्या उत्पादनात दुपटिने वाढ होणे गरजेचे आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत घरकुलचे निधी अभावी 985 अर्ज प्रलंबित आहेत, प्रत्येक जिल्ह्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक असे एकूण 72 वसतिगृहचा शासकीय आदेश निघाला मात्र मुलांना त्याचा अजूनही लाभ नाही, महाज्योति संस्थाच्या माध्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संशोधनसाठी शिष्यवृत्ती इत्यादि योजनामध्ये भ्रष्टाचार, वसंतराव नाइक महामंडलच्या बेरोजगारासाठी प्रशिक्षण व स्वंय रोजगार योजना लागू कराव्या, इत्यादि बाबत अनेकांची भाषणे झाली. प्रस्तविक अंगद मेश्राम तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

