✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रच्या शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे. अती मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्याचे पिक वाहून गेले. काही भागात तर ओला दुष्काळ झाला आहे. यामुळे शेतकरी पूर्णत खचला असून त्याला शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे. पण प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे आज अनेक शेतकरी शासकीय लाभा पासून वंचित आहे.
आज शेतातील पीक पुरंत नष्ट झाले आहे या सर्व प्रसंगातून कसाबसा सावरत असलेला शेतकरी आज जंगली प्राण्यांचा हौदासाने मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे. ह्याच्या बंदोबस्त करण्याकरीता सरकारने अनुदान तत्वावर शेतकराना ताराचे कुंपणाची सोय करावी. काही हिस्सा शेतकऱ्याकडून घेऊन त्यांना ताराचे कुंपणाची व्यवस्था केली तर पिकाची नासाळी होण्यार नाही व त्याना मोबदला मिळेल अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडी तर्फे उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यानच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व कृषी मंत्री अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
