मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
इगतपुरी:- 30 ऑक्टोबरला स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे इगतपुरी तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. गाव तिथे शाखा आणि घर तिथे स्वराज्य या अभियानांतर्गततालुक्यातील अनेक गावांमध्ये शाखा उदघाटन कार्यक्रम होणार आहे.
यावेळी इगतपुरी तालुक्यामध्ये संभाजी राजे हे डौऱ्यारावर आले होते. त्यावेळी संभाजी राजे हे शिवतीर्थ उद्योग समूह येथील शिवाजी फोकने यांच्या निवासस्थानी त्याचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
भोजनाचा कार्यक्रम आटोपल्या नंतर संभाजी राजे यांनी एस एम बी टी हॉस्पिटल समोरील पंचवटी अमृततुल्य येथे धावती भेट दिली असता. येथे उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी संभाजी राजे याची भेट घेतली यावेळी करण गायकर, गणेश कदम कैलास जाधव, भाऊसाहेब मोंढे, रवी फोकने, रोहिदास फोकने, इत्यादी कार्यकर्त्यांनी आपली हजेरी लावली.