युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ
नागपूर:- जिल्हातील कळमेश्वरच्या पुरवठा विभागाकडून तालुक्यातील प्रत्येक गावात रेशनिंगचे स्वस्त धान्य पोहोचते प्रत्येक लाभधारक कुटुंबाला त्यांचा लाभ होताना दिसतो परंतु तालुक्यात 76 च्या आसपास स्वास्थ धान्य दुकान असून यात अंतोदय व प्राधान्य असे दोन प्रकारचे धान्य लाभार्थ्यांना योजनेच्या माध्यमातून मिळते मात्र महिन्याला गावाला पोहोचणारे शासकीय धान्य खुद लाभार्थी बाजारात विकत असल्याचे चित्र कळमेश्वर व मोहपासह तालुक्यातील बहुतेक गाव खेड्यात दिसून येत आहे.
रेशन मध्ये मिळणारा तांदूळ लाभार्थी व्यापाऱ्यांना 14 रुपये किलो दराने विकून मोकळे होतात यात व्यापाऱ्यांचा मोठे घबाड मिळत असल्याने ते मालामाल होत आहेत. खरेदीचे थेट कनेक्शन राईस मिलसी सलग्न असून या तांदळाची रिपाकिय करून तो पुन्हा थेट बाजारात पन्नास रुपये किलो दराने विकला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे शासनाकडून कमी दराने मिळणाऱ्या धान्याची येथील लाभार्थ्यांना कोणतीच पर्वा नाही धान्य कोडीमोल दराने विकले जात आहे. एकूणच शासनाच्या डोळ्या देखत एक प्रकारे फसवणूक केली जात आहे.
गोरगरिबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शासन पुरवठा विभागामार्फत तालुक्यातील अनेक रेशनिंग धान्य दुकानातून लाभार्थ्यांना महिन्याला धान्य वाटप केले जाते. काही अंतोदय तर काही प्राधान्य अशा योजनेतून लाभार्थ्यांना धान्य वाटप केले जाते. अंतोदय योजनेच्या माध्यमातून 25 किलो तांदूळ दहा किलो गहू एक किलो साखर तर प्राधान्य योजनेतून प्रति किलो चार किलो तांदूळ व एक किलो गहू असे धान्य महिन्याला वाटप केले जाते. परंतु कळमेश्वर तालुक्यात बहुतेक गावां मधील रेशनिंगचे लाभार्थी शासनाचे मिळणारे धान्य बाजारात विकत आहे. या धान्यातून आपला इतर खर्च भागवीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या धान्याची कोणतीच किंमत येथील लाभार्थ्यांना नसल्याचे स्पष्ट होतात तालुक्यात बहुतेक दुकाने ऑनलाइन झाली आहेत. त्यामुळे तेथील लाभार्थ्यांना मशीनवर ऑनलाईन अंगठ्याचा ठसा घेऊन दुकानदाराकडून धान्य दिले जाते त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्याजवळ सर्वच लाभार्थ्यांना धान्याचा लाभ मिळतो परंतु काही महिन्यापासून प्रत्येक गावात काळा बाजारात धान्य विकत घेणाऱ्याचे भावत असल्याने महिन्याला ठरल्याप्रमाणे या गाड्या गावात पोहोचतात त्यामुळे लाभार्थ्यांना मिळालेले धान्य लाभार्थ्यांची अगदी मूळ किंमत विकत आहेत.
यासंदर्भात कळमेश्वरच्या पुरवठा विभागाकडून महिन्याला धान्य लाभार्थ्यांना पोहोचते परंतु गावात गेल्यावर लाभार्थी धान्य विकत असतील तर त्यांनी विचार करणे गरजेचे आहे काही लाभार्थ्यांना शासनाच्या धान्याची गरज नसेल तर तसे त्यांनी शासनाला कळविले पाहिजे. कळमेश्वर तहसीलदार सचिन यादव

