Saturday, February 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

एकाच चितेवर रचली गेली 5 लोकांची चीता. बघता क्षणीच सर्वाचे मन हेलावले.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 2, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
एकाच चितेवर रचली गेली 5 लोकांची चीता. बघता क्षणीच सर्वाचे मन हेलावले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

कोल्हापूर :- परवा संपूर्ण राज्याचे मन हेलावणारी घटना समोर आली होती. पंढरपूर येथे पायी वारी करीता निघालेल्या वारकऱ्यांचा अपघात झाला होता. त्यात 7 वारकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एरव्ही टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला की उभा गाव त्यात तल्लीन व्हायचा, लहान थोरासह सगळ्यांचीच पावले गावचे शक्तीपीठ असलेल्या विठ्ठल मंदिराकडे आपसूकच वळायची. आज मंगळवारीही टाळ मृदुंगचा गजर उभ्या शिये-जठारवाडी परिसरात घुमला खरा, मात्र, या आवाजाला अश्रूंची किनार होती. आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.

जुनोनी(ता.सांगोला) या गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील पाच जणांचा तर वळीवडे येथील दोघा मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव मंगळवारी पहाटे जठारवाडी गावात पोहोचले. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत पाचही जणांचे पार्थिव ठेवत टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यातील जठारवाडी येथील ४ महिला व एक पुरुष अशा पाच जणांवर मंगळवारी सकाळी आठ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच ठिकाणी रचण्यात आलेल्या चितेवर पाचही जणांचे अंत्यसंस्कार होताना उभा गाव अश्रूंनी डबडबला होता.

जठारवाडी येथील ३५ जणांची दिंडी आठ दिवसांपूर्वी गावातून पंढरपूरकडे रवाना झाली. ही दिंडी सोमवारी सायंकाळी जुनोनी गावाजवळून जात असताना अचानक पाठीमागून आलेली कार या दिंडीत घुसली. यात सात जण ठार झाले. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. शारदा आनंदा घोडके (वय ६१), रंजना बळवंत जाधव (५५), सुनिता पवार, गौरव पवार (१४), सर्जेराव श्रीपती जाधव (५२), सुनीता सुभाष काटे (५०), शांताबाई शिवाजी जाधव (६२) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी सुनिता पवार आणि गौरव पवार हे मायलेक असून ते जठारवाडी इथले पाहुणे आहेत. ते मूळचे वळीवडे गावचे रहिवासी आहेत.

विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल, सोमवारी सायंकाळी कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांनी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

Previous Post

यवतमाळ: प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य बरलोटा यांचा अपघाती मृत्यू, कारचा टायर फुटल्याने घडली भीषण दुर्घटना.

Next Post

वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

वर्धा जिल्हातील हिंगणघाट शहर अंधेर नगरी चौपट राजा झाल्याचे चित्र.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In