युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- जिल्हा हा प्रतिभावंत कलाकार जिल्हा म्हणून संपूर्ण राज्यात ओळखला जातो. नागपूर जिल्हाने अनेक असे बहुमुखी कलाकार चित्रपट, नाटकसृष्टीला दिले आहे. त्यात आता अजुन एक नाव चमकल आहे. ते आहे ज्येष्ठ कलाकार रामक्रिष्ण भक्ते. सावनेर तालुक्यातील बुरुजवाडा येथील वरिष्ठ कलावंत रामक्रिष्ण भक्ते यांची रानटी माणस या कलावंत चित्रपट निर्माते म्हणून निवड करण्यात आली आहे. बोरुजवाडा येथील अत्यंत गरीब घराण्यातील असलेले धनगर समाजाचे ते कलावंत आहेत व लेखक आणि गीतकार ही आहेत. रामक्रिष्ण भक्ते यांची चित्रपट कलावंत म्हणून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे त्यांची मराठी चित्रपट महामंडळमध्ये कथा रजिस्टर नोंद करण्यात आली आहे.
चित्रपट कलावंत म्हणून रामक्रिष्ण भक्ते यांनी बालपणापासून अत्यंत हलकीची परिस्थिती असताना त्यांच्या वडिलांचे मेंढपाळ यांचा व्यवसाय असल्याने ते लहानपणापासून कलावंत व्यवसायात असल्याने आज त्यांनी रानटी माणस हा चित्रपट आयोजित करण्याची मोठी योजना आखली आहे. ही कथा स्वतःच्या जीवनचरित्रावर आधारित असून त्याच्यावर मागील अनेक दिवसापासून त्यांचे कार्य सुरू आहे अशी माहिती लेखक रामक्रिष्ण भक्ते यांनी दिली आहे. हे हल्ली मुक्काम गोरेवाडा येथे राहत असून ते चाळीस वर्षापासून राहत आहेत. त्यांचे शिक्षण झिंगाबाई टाकळी येथील मराठी महाविद्यालयात झाले आहे व त्यानंतर ते रानटी माणस चित्रपटात कलावंत व लेखक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सर्विकडे त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

