✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ
नागपूर:- येथून एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींचा पेन्शन घोटाळा झालेच समोर आले आहे. मृतक कर्मचाऱ्याच्या नावाची पेन्शनची रक्कम जवळच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होती असे समोर आलेने या कोट्यवधींचा भष्ट्राचाराचे पितळ उघडे पडले आहे.
मागील सात ते आठ वर्षांपासून हे सर्व मृतक पेन्शन भष्ट्राचार सुरू होता. हे प्रकरण समोर येताच कनिष्ठ महिला लिपिकाला निलंबित करण्यात आले असून. जिल्हा परिषद सीईओ यांनी केली चौकशी समिती गठीत केलीय. या पेन्शन घोटाळ्यात आणखी काही जण अडकण्याची शक्यता आहे.
नागपूर जिल्हा परिषद येथे शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची जबाबदारी महिला लिपिकाकडे देण्यात आली होती. सेवानिवृत्ती नंतर मृत पावलेले कर्मचारी ‘हयात’ असल्याचे दाखवीत त्यांची पेन्शन आपल्या जवळील व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्या खात्यात त्या वळती करीत होत्या.
मागील सात ते आठ वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती महिला कर्मचारी रजेवरही गेली आहे. त्यामुळे तिचे काम दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे वर्ग करण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्याला मोठा संशय आला. त्यामुळे हे प्रकरण समोर आलेय.
यात मोठा गैरव्यवहार असल्याचे शिक्षण विभागाकडून आलेल्या अहवालातून दिसते. या अहवालाच्या आधारे या संबंधित महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आली. चौकशी समितीही गठित करण्यात आली. समिती अहवाल आल्यावर पुढील प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई निश्चित करण्यात येईल, असं नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितलं.
शिक्षण विभागात असा गैरव्यवहार होत होता. मग, शिक्षण अधिकाऱ्यांना हे कसं कळलं नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे.