उमेश इंगळे, अकोला प्रतिनिधी
अकोला:- सर्वोपचार शासकीय रुग्णालयात रुग्णांना प्लेट्स लेट मिळत नव्हते गोरगरिब रुग्णांना पैसे खर्च करून खासगी रक्तपेढीतुन रक्त व प्लेट्स लेट आणावे लागत होते. याकरीता महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीची पाहणी केली होती. रक्तपेढीतील प्लेट्स लेट बनवायची मशिन गेल्या एका महिन्यांपासून बंद होती असे दिसून आले होते. संबंधित अधिकारी यांना विचारले असता लवकरात लवकर मशिन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी ही मशीन सुरू करण्याबाबत त्यांना आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आठ दिवसांत जर प्लेट्स लेट बनवायची मशिन सुरू झाली नाही तर महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना तिव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला होता.
महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीची दखल घेत प्लेटलेट्स बनवायची मशिन सुरू करण्यात आली असून उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून सर्वोपचार रुग्णालयातील प्लेट्सलेटची गरज असलेल्या रुग्णानी उमेश सुरेशराव इंगळे यांचे आभार मानले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे, जिल्हा महासचिव समिर खान, जिल्हा सहसचिव सतिश तेलगोटे, उमेश शेजे, सुरज खंडारे आदी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

