Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

संगमनेर: उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंत शिव सैनिकांना विश्वासात न घेता पदाधिकार्‍यांच्या केल्या नियुक्त्या, विरोधा नंतर रद्द.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 7, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
संगमनेर: उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंत शिव सैनिकांना विश्वासात न घेता पदाधिकार्‍यांच्या केल्या नियुक्त्या, विरोधा नंतर रद्द.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- महाराष्ट्रच्या राजकारणात शिवसेनेची गटबाजी उफलून आल्यानंतर दोन गट पडले. त्यात आता कार्यकर्ते इकडे का तिकडे कोणत्या गटात हा संभ्रम कायम आहे. त्यात संगमनेर शहरासह तालुक्यात उद्धव ठाकरे शिवसेनेच्या जुन्या निष्ठावंत शिव सैनिकांना वरिष्ठांनी विश्वासात न घेता संपर्कप्रमुखांच्या आदेशाने नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या होत्या, मात्र संपर्कप्रमुखांच्या विरोधात सर्वत्र आंदोलने झाल्याने त्या सर्व नियुक्त्या अवघ्या चारच दिवसात स्थगिती देण्याची नामुष्की शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवर आली आहे.

ही स्थगिती जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या हस्तक्षेपामुळे झाल्याचा आरोप संपर्क प्रमुख घोलप समर्थकांनी केल्यामुळे आता ठाकरे शिवसेनेत संगमनेरमध्ये बंडाळी निर्माण झाली आहे. दोन्ही गटांच्या समर्थकांनी संपर्क प्रमुखांसह जिल्हा प्रमुखांना या निवडीस कारणीभूत ठरवून टार्गेट केल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी भाजपचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा., राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर कार्यक्रमात हजेरी लावल्याची तक्रार पदाधिकार्‍यांनी वरिष्ठांपर्यंत केली आहे. त्यामुळे आहेरांची हकालपट्टी करून त्यांच्या जागी भाऊसाहेब हासे यांची निवड झाली होती. त्यामुळे आहेरांचे समर्थक चांगलेच संतप्त झाले. ठाकरे शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांसह माजी पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेत आहेरांच्या समर्थनार्थ निषेध सभा घेत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख बबन घोलप यांना टार्गेट केले. त्यांचा निषेध करून नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांवर आक्षेप घेतल्याची माहिती ‘मातोश्री’ पर्यंत पोहोचली. ठाकरे सेनेचे सचिव खा. विनायक राऊत यांनी तत्काळ नवीन नियुक्त्यांना स्थगिती देत जुन्या नियुक्त्या कायम ठेवल्याचे जाहीर केल्याने आनंदीत झालेल्या नुतन पदाधिकार्‍यांच्या आनंदावर चारच दिवसात विरजण पडले, मात्र जुन्या पदाधिकार्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नूतन पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यास जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनीच हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप करीत संपर्क प्रमुख बबन घोलप समर्थक शिवसैनिकांनी खेवरे यांना टार्गेट करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे जुन्या- नव्यांचा मेळ घालत संपर्कप्रमुख बबन घोलप व जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांत मेळ घालण्याचे कडवे आव्हान ठाकरे शिवसेनेच्या वरिष्ठांसमारे उभे ठाकले आहे.
ठाकरे शिवसेना पक्ष अगोदरच अडचणीत असताना आता संगमनेरमध्ये संपर्कप्रमुख घोलप व जिल्हाप्रमुख खेवरे या दोन्ही गटांच्या समर्थक शिव सैनिकांनी परस्पर विरोधी भूमिका घेतल्याने ठाकरे सेना आणखी अडचणीत सापडली आहे. अनेक वर्षांपासून उत्तर नगर जिल्हाप्रमुख पद खेवरेंकडे आहे, अशात ठाकरे सेनेची ताकद वाढविण्याकरिता संपर्क प्रमुख घोलप यांची निवड जमेची बाजू ठरणार होती, परंतु त्यांच्या आदेशानव्ये झालेल्या नव्या पदाधिकारी निवडींना स्थगिती देणे ही गोष्ट घोलप यांच्यासाठी कमी पणाची ठरली आहे. त्यामुळे आता संपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुखांच्या वादात ठाकरे शिवसेना वरिष्ठ स्तरावर नवीन निवडींवर नव्या- जुन्यांचा कसा मेळ घालणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जुन्या- नव्यांचा मेळ घालण्याचे आव्हान..!
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये या गटबाजीचा फटका ठाकरे यांच्या शिवसेनेला बसू शकतो. शिवसेनेच्या काही पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करताना आजी-माजी निष्ठावंत शिवसैनिकांना विश्वासात घेतल्यामुळे त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे.

Previous Post

नाशिक शहरातील एका घराला भीषण आग, संसार उपयोगी साहित्य जाळून खाक, लाखोचे नुकसान.

Next Post

नगर तालुक्यातील नारायणडोह येथे हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नगर तालुक्यातील  नारायणडोह येथे हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ.

नगर तालुक्यातील नारायणडोह येथे हॅन्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In