Monday, May 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

पुणे महानगर पालिकेत लवकरच होणार आहे शेकडो पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 9, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे महानगर पालिकेत लवकरच होणार आहे शेकडो पदांची भरती; आरोग्य, अग्निशामक दलासाठी होणार परीक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे

पुणेे:- महानगरपालिकेत लवकरच शेकडो पदाची नोकर भरती होणार आहे. याअगोदर 450 पदांची नोकरभरती झाली होती. आता आणखी आरोग्य, अग्निशामक दल व अन्य विभागातील विविध संवर्गातील पदांची भरती होणार आहे. येत्या आठवडाभरात खातेनिहाय पदसंख्या निश्चित करून जाहिरात काढली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

महापालिकेच्या आकृतीबंधाला मान्यतेसाठी बराच विलंब लागल्याने गेल्या अनेक वर्षांत अभियंते वगळता अन्य विभागांमध्ये भरतीच झालेली नव्हती. त्यामुळे सुमारे १८ हजार कर्मचारी असलेल्या महापालिकेमध्ये सध्या अनेक पदे रिक्त आहेत. महापालिकेत नुकतीच ४५० पदांची नोकरभरती झाली; मात्र आरोग्य व अग्निशामक दलासारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये मोठ्या संख्येने पदे रिक्त आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या नोकरभरतीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

याबाबत विक्रम कुमार यांनी म्हणाले, “राज्यात मोठ्या कालावधीनंतर महापालिकांमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पुणे महापालिकेने यामध्ये आघाडी घेतली असून अभियंते, अतिक्रमण निरीक्षक, विधी सहायक आणि लिपिक अशी सुमारे ४५० पदांची भरती करण्यात आली. यातील निवड झालेले उमेदवार लवकरच सेवेत रूजू होतील. पुढील टप्प्यामध्ये 200 हून अधिक पदांची भरती केली जाणार असून पुढील आठवड्यात या पदभरतीला मान्यता देण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि अग्निशामक दलातील भरतीला प्राधान्य आहे. पदांची आकडेवारी आणि जाहिरात नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येईल. कार्यकारी अभियंत्यांची भरती केली जाणार असून यामुळे अनुभवी अभियंते मिळतील.”

अभियंत्यांची 25 टक्के पदे वाढणार..
पुणे महानगर पालिकेच्या कार्य क्षेत्रात नव्याने 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्येत वाढ झाल्याने 2007 मध्ये तयार केलेल्या आकृती बंधातील जागांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रामुख्याने अभियंत्यांच्या जागांमध्ये वाढ होईल. महापालिकेकडे सध्या 800 हून अधिक अभियंते आहेत. त्यामध्ये साधारण 22 ते 25 टक्के पदांची वाढ होईल. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेऊन आकृतीबंधाचा आढावा घेऊन प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल, अशी माहितीही विक्रम कुमार यांनी दिली.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिनानिमित घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेत देवगिरीकर प्रथम.

Next Post

आता महागाईच्या नाशिककरांना बसणार फटका, मिसळ आणि वडा पाव महागणार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
आता महागाईच्या नाशिककरांना बसणार फटका, मिसळ आणि वडा पाव महागणार.

आता महागाईच्या नाशिककरांना बसणार फटका, मिसळ आणि वडा पाव महागणार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In