Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 10, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीसह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हुजेफ रौफ शेख २१ रा.माळी गल्ली नं.२,हनुमान मंदिरा शेजारी वडाळागाव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना वडाळागावातील म्हाडा बिल्डींग भागात २४ मार्च २०२१ रोजी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एन.एस.बोंडे यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयास सादर केले होते. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.एम. व्ही. भाटीया यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अ‍ॅड.आर.एम.कोतवाल यांनी काम पाहिले. न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीस सीआरपीसी कलम २३५ २ अन्वये भादवी कलम ३५४,४५२,३२३ आणि बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ चे कलम ८,१२ अन्वये दोषी ठरवत सहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

घरात शिरून मुलीचा विनयभंग

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधत आरोपीने बळजबरीने घरात शिरून मुलीचा विनयभंग केला होता. ही घटना याच इमारतीतील तिस-या मजल्यावर राहणा-या महिलेच्या निदर्शनास आल्याने तिने टोकले असता आरोपीने तिचाही विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Previous Post

व्यापा-यास खंडणी मागुन लुटणा-या टोळीस राजस्थान, सुजनगड येथून अटक

Next Post

वर्धा कारागृहामध्ये विविध गुन्ह्यातील 130 बंदींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
वर्धा कारागृहामध्ये विविध गुन्ह्यातील 130 बंदींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण.

वर्धा कारागृहामध्ये विविध गुन्ह्यातील 130 बंदींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In