Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

माता महाकाली मंदीर परिसराचा विद्युती करणासह विकास कामांच्‍या निविदेला शासनाची मंजूरी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 12, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
माता महाकाली मंदीर परिसराचा विद्युती करणासह विकास कामांच्‍या निविदेला शासनाची मंजूरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

६० कोटी रू. किेंमतीच्‍या विकास प्रकल्‍पाला लवकरच सुरूवात होणार: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177

चंद्रपूरचे:- आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीराशी संबंधित विद्युतीकरणासह विकास कामांच्‍या निविदेला शासनाची मंजूरी मिळाली असून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांच्या फलस्वरूप ६० कोटी रु. किमतीच्या या विकास प्रकल्पाला लवकरच सुरुवात होणार आहे. सदर निविदेला सार्वजनिक बांधकाम विभागाने दिनांक ११ नोव्‍हेंबर २०२२ रोजीच्‍या आदेशान्‍वये मान्‍यता दिली आहे. या संदर्भात पुरातत्व विभागाची परवानगी देखील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार लवकरच प्राप्त करणार आहेत.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात श्री महाकाली मंदीर देवस्‍थान परिसराच्‍या विकासासाठी ६० कोटी रू. निधी मंजूर करविला. गोंडकालीन इतिहासाची साक्ष देणा-या विदर्भातील अष्‍टशक्‍तीपिठांपैकी एक असलेल्‍या श्री महाकाली मंदीर परिसराच्‍या विकासासाठी दिनांक १९ सप्‍टेंबर २०१९ च्‍या नगरविकास विभागाच्‍या शासन निर्णयान्‍वये मान्‍यता देण्‍यात आली आहे. महाकाली मंदीर विकास कार्यक्रमाअंतर्गत गोंडकालीन स्‍थापत्‍य व शिल्‍पकला जपून त्‍याचाच आधार घेवून दोन टप्‍प्‍यात विकास आराखडा तयार करण्‍यात आला आहे. टप्‍पा-१ अंतर्गत धर्मशाळा इमारत, स्‍वयंपाक घर, भाविकांसाठी दर्शन रांगा, दुकाने, मुख्‍य प्रवेश द्वाराचे बांधकाम, फ्लॅग पोस्‍ट, मंडप परिसराचा विकास, मुख्‍य प्रवेशद्वारावर शिल्‍पकला तयार करणे, संरक्षण भिंत तसेच अस्‍तीत्‍वात सोयी सुविधांची पुर्नबांधणी करणे या गोंष्‍टींचा अंतर्भाव टप्‍पा १ मध्‍ये आहे. यासाठी मंजूर ६० कोटी रु निधी डिपॉझिट झाले असल्याने कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

टप्‍पा –२ अंतर्गत अतिविशिष्‍ट व्‍यक्‍तींकरिता प्रवेशद्वार, माता महाकालीची ८० फुट उंच मुर्ती, दिपस्‍तंभ, संग्रहालय, घाट परिसराचा विकास, मनोरे, मंदीर परिसराचा विकास याबाबींचा समावेश आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्‍या काळात चंद्रपूरच्‍या या आराध्‍य दैवताच्‍या मंदिर परिसराच्‍या विकासासाठी घेतलेला पुढाकार आता मुर्त स्‍वरूपात साकार होत आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून चंद्रपूरकरांच्‍या श्रध्‍देशी निगडीत हा प्रकल्‍प मार्गी लागणार आहे. या विकासकामाशी संबंधित निविदेला शासन मान्‍यता मिळाल्‍याने या महत्‍वपूर्ण प्रकल्‍पाचा मार्ग सुकर व सुलभ झाला आहे.

Previous Post

मराठवाडा चेंबर्स ऑफ ट्रेड व कॉमर्स औरंगाबाद सचिव पदी बीड येथील वाय जनार्धन राव यांची बिनविरोध निवड.

Next Post

मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न.

मानोरा व कळमना येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे लोकार्पण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In