प्रविण जगताप, प्रतिनिधी
मो. 9284981757
वर्धा:- दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन पुलगाव येथे मुखबीर कडुन खात्रीशीर माहिती प्राप्त झाली की, आरोपी राजु जयस्वाल, व्यवसाय उदय बार व देशी दारुचे दुकान मालक याचे सांगणेवरुन आरोपी वर्णा गाडी क्रमांक एम.एच.-४३/आर.-३९२ चा चालक हा त्याचे ताब्यातील वाहनाने अवैध देशी दारु व विदेशी दारुची वाहतुक करीत आहे अशा माहितीवरुन नाकेबंदी करुन यातील वाहनास थांबण्याचा ईशारा केला असता वाहनचालक याने त्याचे ताब्यातील वाहन थांबवून अंधाराचा फायदा घेवून पसार झाला. सदर वाहनाची पाहणी केली असता वाहना मध्ये सहा खरड्याचे खोक्यात देशी दारुच्या ६०० सिलबंद शिश्या, एका खरड्याचे खोक्यात विदेशी दारुच्या १८४ शिश्या असा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर मुद्देमाल व एक हुंडाई कंपनीची वरणा चारचाकी वाहन असा एकुण कि. ९,९५,४०० रु. चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी तांविरुध्द दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगाव श्री गोकुळसिंग पाटील यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री. शैलेश शेळके, पो.स्टे. पुलगाव यांचे हजेरीत पोलीस अंमलदार देविदास दुबे, महादेव सानप, गजानन गहुकर, अन्ना दुर्गे, सचिन ठाकरे, रवी जुगनाके, विनोद रघाटाटे, मुकेश वांदिले, पंजाब राठोड, सागर लोमटे, फिरोज पठाण सिध्दार्थ सोमकुवर यांनी केली.

