मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली,दि.12 नोव्ह:- पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुज तारे, श्री. कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून तसेच एसडीपीओ श्री अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शना खाली उप पोस्टे पेरमिली येथे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य आदिवासी रेला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे उदघाटन श्री योगेश राठोड असिस्टंट कामांडन्ट सीआरपीएफ यांनी केले. तसेच कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री गणेश मडावी वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ पत्रकार आसिफ पठाण, साई चंदनखेडे हे उपस्थित होते. रेला नृत्य स्पर्धेकरीता परीक्षक श्री माऊलकर मुख्याध्यापक, श्री मनिष नागदेवते शासकीय आश्रम शाळा हे उपस्थित होते. सदर स्पर्धेची सुरूवात भगवान बिरसा मुंडा व वीर बाबुराव शेडमाके यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. मान्यवरांनी महान आदिवासी पारंपारिक संस्कृतीबाबत माहिती विशद केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री धवल देशमुख यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर आदिवासी पारंपारिक रेला नृत्य स्पर्धे करिता अतिदुर्गम भागातील चंद्रा, मेडपल्ली, तुमरकसा, कोरेली, रापल्ले, आलदंडी, चंद्राटोला, पेरमिली, मिरकल या गावातील एकूण 16 रेला नृत्य संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमास 350 ते 400 प्रेक्षक उपस्थित होते. प्रत्येक रेला ग्रुपने उत्कृष्ठ रेला नृत्याचे सादरीकरण केले. त्या मधून पंचांनी त्यांना गुण वाटप केले. परिक्षकांनी दिलेल्या गुणांप्रमाणे प्रथम क्रं. चंद्रा रेला संघ, द्वितीय क्रं. कोडसेलगुडम रेला ग्रुप व तृतीय क्रं. कासमपल्ली रेला ग्रुप या संघानी पटकाविले. प्रथम, द्वितीय, तृतीय क्रं. विजेत्या संघांना अनुक्रमे 3000/- रू,2000/- रू व 1000/- रू. रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच इतर 13 संघांना, विशेष प्रोत्साहनपर रोख 501/- रु. बक्षीस व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
तसेच उपस्थित तरुण युवक युवतींना स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन करून उप पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन गाव तिथे अभ्यासिका ही योजना राबविणार असल्याबाबत माहिती देण्यात आली.
सदर शिबीर यशस्वी होण्याकरिता प्रभारी अधिकारी धवल देशमुख, पोउपनि अजिंक्य जाधव, पोउपनि दिपक सोनुने, पोलिस अधिकारी श्री दास साहेब, शेखावत साहेब, जिल्हा पोलिस व असआरपीएफ आणि सीआरपीएफच्या अमलदारांनी संघभावनेने परिश्रम घेतले. सदर मेळाव्यात उपस्थित नागरिकांना भोजनाची व्यवस्था करून मेळाव्याची सांगता करण्यात आले आहे.

