विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
राहुरी:- शहरातील दैनिक सर्वमंथनचे संपादक अनिल कोळसे यांना अहमदनगर मनमाड मार्गी वरील राहुरी येथील एमआयडीसी येथे अज्ञात व्यक्तीने गाडी आडवी लावुन पत्रकार अनिल कोळसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना 11 नोव्हेंबर 2022 रोजी 11.30 वाजता घडली असून राहुरी तालुक्यातील पत्रकारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, दैनिक सर्वमंथनचे संपादक अनिल भाऊ कोळसे हे त्यांच्या स्वतः च्या मालकीच्या चार चाकी वाहनातून काही कामासाठी श्रीरामपूर येथे जात असताना अहमदनगर मनमाड महामार्गावरील एम. आय. डी. सी. परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात ईसमाने संपादक यांच्या कारला गाडी आडवी लावत शिवीगाळ करत दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. तू खाली उतर तुझा कार्यक्रम करतो असे सूरू असताना शेजारील व प्रवास करणारे प्रवासी आणि शेतकरी बांधवांनी धाव घेत संपादक यांना ओळखताच मदतीसाठी धावून आले असता सदरील अज्ञात व्यक्तीने तेथून धुम ठोकून पळून गेला. यावेळी काही पत्रकार बंधू हे राहुरी येथे प्रशासनाच्या पत्रकार परिषदेच्या कामासाठी जात असतानी त्यांनी संपादक अनिल कोळसे यांच्या जवळ थांबून घडलेला प्रकार जाणून घेतला आणि या घटनेचा निषेध केला आहे.
सदर अज्ञात व्यक्तीची दुचाकी हि विनाक्रमांकाची असून गाडीचा रंग पांढरा व निळा असा मिश्र आहे. ही घटना घडत असतानी संपादक यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नसल्याची माहिती समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील अवैध व्यवसाय सुरू असल्याचे वृत्त दैनिक सार्वमंथनच्या संपादकांनी छापल्यामुळे काही समाजकंटकांनी सार्वमंथनचे वृत्तपत्र हे जाळले असून त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दुचाकीवर आलेल्या अज्ञात तरुणाचा संपादक अनिल कोळसे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याचा हेतू होता का ? त्याच्याकडे हत्यारे होती का ? सदरील अज्ञात व्यक्ती हा राहुरीतील अवैध धंद्यांशी निगडित आहे का ? संपादक अनिल कोळसे यांना कोणी जीवे मारण्याची सुपारी दिली? असे अनेक प्रश्न समोर येत असून या घटनेचा निषेध करत राहुरी तालुका पत्रकारांकडून या घटनेला उधान आले आहे.
संपादक अनिल कोळसे यांच्यावर झालेल्या शिवीगाळ व दमदाटी प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या अज्ञात तरूणाचा शोध घेऊन कठोर कार्यरवाही करावी आणि संपादक अनिल कोळसे यांना पोलीस संरक्षण द्यावे. अहमदनगर जिल्हा कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेची चौकशी करून अज्ञात तरुणांविरोधात कडक कार्यवाही करून या पुढे अशा घटना होणार नाही असा टारगेट आणि अवैध व्यवसाय करणाऱ्या धंद्यांना आळा घालावा अशी मागणी राहुरी तालुक्यातील पत्रकारांकडून केली जात आहे.

