Monday, January 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकामुळे झाले भकास.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
November 13, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकामुळे झाले भकास.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

नाशिक:- कोट्यवधी रुपये खर्चुन तयार केलेला स्मार्ट रोड बेशिस्त वाहनचालकांमुळे स्मार्ट दिसत नाही. वाहतूक पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याने स्मार्ट रोडवरील सायकल ट्रॅकवर सरसकट चारचाकी वाहनांचे वाहनतळ झाले असून, त्यामुळे सायकल ट्रॅकचे दुभाजकही तुटत चालले आहे. त्यामुळे याकडे लक्ष न दिल्यास वाहनांमुळे संपूर्ण सायकल ट्रॅकच दिसेनासा होण्याची शक्यता वाढली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका सिग्नलतर्फे दुतर्फा स्मार्ट रोड उभारण्यात आला. शहराच्या मध्यवर्ती भागातील या मार्गावर जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस या महत्त्वाच्या शासकीय आस्थापनांसह शाळा, व्यावसायिक संकुले आहेत. त्याचप्रमाणे या मार्गावरून शहरातील इतर मार्गांवर जाणे सोयीस्कर असते. त्यामुळे हा स्मार्ट रस्ता महत्त्वाचा मानला जातो. त्यानुसार येथे सिमेंटच्या रस्त्यासह प्रशस्त फुटपाथ, सायकल ट्रॅक, सीसीटीव्ही, आकर्षक पथदीप उभारले आहेत. या मार्गावरून ये-जा करणार्‍यांना सुखद अनुभव मिळत होता. मात्र, नव्याची नवलाई संपताच येथेही बेशिस्तपणा दिसत आहे., त्याकडे वाहतूक पोलिसांचाही कानाडोळा चर्चेचा विषय बनला आहे. सायकल ट्रॅकवर सर्रास चारचाकी वाहने उभी करून वाहनधारक त्यांच्या कामानिमित्त तासनतास शासकीय कार्यालयांमध्ये जात आहेत. त्यामुळे हा स्मार्ट रोड की, वाहनतळ असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहर पोलिसांच्या वतीने शहरात टोइंग कारवाई केली जाते, मात्र या मार्गावर टोइंग कारवाई होत नसल्याने वाहनधारक हक्काचे वाहनतळ समजून सायकल ट्रॅकवरच वाहने उभी करताना दिसत आहेत. वाहने उभी करताना व तेथून बाहेर निघताना अनेकदा चालक सायकल ट्रॅकच्या दुभाजकावरून वाहने नेत असल्याने अनेक दुभाजक तुटले आहेत, तर काही ठिकाणच्या दुभाजकांची अज्ञात व्यक्तींनी विल्हेवाट लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा हा रस्ता वाहनतळामुळे बकाल होताना दिसत आहे.

सायकल ट्रॅकवर पार्किंग
स्मार्ट रोडवरून दररोज हजारो वाहने जात असतात. त्यापैकी शेकडो वाहने सायकल ट्रॅकवर उभी राहतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण होते. बेशिस्त चालकांवर दंडात्मक व टोइंग कारवाई सर्वत्र होत असताना या मार्गावर अपेक्षित कारवाई होत नसल्याने चालकांमध्ये धाकच नसल्याचे दिसते. पोलिसांकडून ई-चलन, टोइंग कारवाई होत नसल्याने तो चर्चेचा विषय बनला गेला आहे.

Previous Post

राहुरी येथील एमआयडीसी येथे अज्ञात व्यक्तीने गाडी आडवी लावुन पत्रकार यांना जीवे मारण्याची धमकी.

Next Post

मालकाच्या घरी चोरी करणाया नोकरास व त्याच्या साथीदारांना केले जेरबंद

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मालकाच्या घरी चोरी करणाया नोकरास व त्याच्या साथीदारांना केले जेरबंद

मालकाच्या घरी चोरी करणाया नोकरास व त्याच्या साथीदारांना केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In