मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
नाशिक:- नाशिक शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस क्राईम ग्राफ वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात गावठी कट्ट्यांचा वापर वाढत चालला आहे. नाशिक शहरात रविवारी दि.१३ एका युवतीच्या स्कुटीच्या डिक्कीमध्ये कट्टा, रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे गावठी कट्टा व दोघांकडे एक कट्टा व तीन काडतुसे आढळून आले आहे.
पोलिसांकडून गत दोन वर्षांत तब्बल १२४ गुन्हेगारांकडून २६ गावठी कट्टे, ५४ काडतुसे जप्त केले. मध्यप्रदेशातील उमरठी गावातून नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कट्ट्यांचा पुरवठा होत असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
तरुणीच्या स्कूटीच्या डीक्कित कट्टा थेट एका युवतीच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गावठी कट्टा आढळून आला. काठे गल्लीतील एका युवतीने बँक फायनान्सकडून कर्ज घेत गाडी खरेदी केली होती. कर्ज थकले असल्याने फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी काठे गल्ली येथील युवतीच्या घरी आले होते. त्यांनी थकीत हप्त्यांबाबत विचारपूस केली असता युवतीने गाडी घेवुन जा, तुमचे सरांना मॅसेज केला आहे. तो अधी वाचण्यास सांगा, असे सांगितले. त्यानुसार शिलेदार पार्किंगमध्ये आले. त्यांनी स्कुटी क्र.एम.एच. १५ एफ. झेड. ०१०७ घेवुन सिडको येथील कार्यालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी अधिकार्यांना युवतीच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गावठी कट्टा आढळून आला. त्यांनी तात्काळ ११२ क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना गावठी कट्ट्याबाबत माहिती दिली. त्यानंतर भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवतीला ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातून पोलिसांनी दुचाकी व गावठी कट्टा जप्त केला. पोलीस चौकशीत तिने साफसफाई करताना बंदुक सापडल्याचे सांगितले आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे सापडला कट्टा
शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सोमवारी दि.१४ रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, कार जप्त केली. सराईत गुन्हेगारावर उपनगर पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, विनयभंगासह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. रोहित उर्फ माल्या गोविंद डिंगम वय २६, रा. जेलरोड नाशिक रोड, नाशिक असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना सोमवारी दि.14बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित डिंगम हा गावठी कट्टा विक्रीसाठी सम्राट गार्डन, उपनगर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. सोनार यांनी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली. पोलिसांनी गुन्हेगाराच्या ताब्यातून एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, कार एम एच 15 एच एम 9002 जप्त केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

