मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील आलापल्ली येथे काल दिनांक 14 नोव्हेंबर रोज सोमवारला सायंकाळी ठीक 7:00 वाजता संघमित्रा बुद्ध विहार आलापल्ली येथे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सुभेदार रामजी सकपाळ यांची जयंती हरषोऊलासाने साजरी करण्यात आली.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे कोषाध्यक्ष आयु प्रा संजय पथाडे सर यांचे सुभेदार रामजी सकपाळ यांच्या जीवनावर सखोल असे मार्गदर्शन केले तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी चे अध्यक्ष आयु आद बी एम दूर्गम सर यानी सुद्धा सुभेदार रामजी सकपाळ यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार आयु आद भीमराव झाडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष यानी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते.
आयु भीमराव झाडे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण, आयु बी एम दूर्गम सर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी, आयु संजय पथाडे सर कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा गडचिरोली दक्षिण, आयु कार्तिक निमसरकार अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आलापल्ली, आयु रविंद्र बारसिंगे कोषाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी, आयु वामन भगत उपाध्यक्ष संस्कार विभाग भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी, आयु गणपत तावाडे, गुरुदेव मेश्राम, आयु दादाजी फुलझेले, आयु देविदास मेश्राम, आयु देविदास वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरी येथील महीला विभागाच्या अध्यक्षा आयुनि इंदिरा करमे, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा अहेरीच्या हिशोब तपासणीस आयुनि अनुला निमसरकार, आयुनि शकुंतला दूर्गम, आयुनि सिंधु तावाडे, चालुरकर बाई, आयुनि सुमनताई निमसरकार, आयुनि मंगला झाडे, आयुषमती नंदा करमरकर, आयुषमती पार्वताबाई कोंडागुरले, उपासक व उपासिका मोठया संख्येने उपस्थित होते.