✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
वर्धा:- पार्वतीबाई नर्सिंग स्कूल, वर्धाच्या सभागृह मध्ये जय संघर्ष संगठन चे चालक वाहक मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. चालक मालक हा वंचित वर्ग असंगठीत वर्गात मोडतो. या वर्गाला संगठीत करून त्यांना कोणतीही मदत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये केली जाते. तसेच त्यांच्या प्रश्नावर वाचा फोडणे आणी त्यांच्या प्रश्नांना सोडविण्यासाठी ही संगठन काम करते. याच उपक्रमचा भाग म्हणून अनेक ठिकाणी मार्गदर्शन मेळावा घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा येथे जिल्हाध्यक्ष संदीप सावरकर यांच्या नेतृत्वात हा मेळावा यशस्वी रित्या समापन झाला.
या मार्गदर्शन मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून जय संघर्ष संगठन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर, प्रसार वा प्रचार प्रमुख सुधीर टोंगे, विदर्भ संघटक प्रकाश इंगळे, नागपूर जिल्हा प्रमुख सुधाकर कामडी, व प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक प्रा अतुलजी शेंडे,संघर्ष ऍग्रो चे संचालक प्रशांत अवचट, राहुल मून, स्वराज्य संगठनप्रणित छावा क्रांतिवीर सेना चे जिल्हाध्यक्ष नंदू मून उपस्थित होते. या मार्गदर्शन मेळावा मध्ये अनेक समस्यावर चर्चासत्र संपन्न झाले, तसेच चालक, वाहक यांच्या कोणत्याही प्रश्नावर मदत करण्याचे आश्वासन वर्धा जिल्हाध्यक्ष संदीप सावरकर यांनी दिले.याला संघर्ष ऍग्रो ग्रुप आणि स्वराज्य संगठन प्रणित छावा क्रांतिवीर सेना तर्फे अनुमोदन दिले.अध्यक्षीय भाषण विनोद चांदेकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन आकाश सुखदेवे यांनी केले. या मेळाव्याला सफल करण्यासाठी शहराध्यक्ष राहुल कुठे, उपाध्यक्ष अनिकेत शिंदे, सचिव राहुल बागडे, कोषध्यक्ष नितीन देशमुख, सहसचिव प्रकाश धोटे, सहकोषाध्यक्ष मुरली सदराणी, कार्याध्यक्ष अविनाश चव्हाण यांनी श्रम घेतले. या मेळाव्याला प्रवीण नांदुरकर, राजा कुराळे, अजय धोटे, नयन गोठे, अक्षय गोलाझी, अमोल शेंडे, अजय तिघाडे, राहुल पंधराम, सुरज लेडे, संजय पाल, सचिन खोबे,गुणवंत कटरे, सौरभ गोमासे, गौरव अंबादाळे, गजानन कोहाड, सुरज चौके अविनाश चव्हाण, सुनील आत्राम हे उपस्थित होते.